ब्रेकिंग न्यूज
⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं? ✦ ⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू
SP News Maregaon

त्र्यंबकेश्वर मंदिरात भाविकाला सुरक्षा रक्षकांचा चोप:कपडे फोटपर्यंत लाथाबुक्क्यांनी मारहाण, देवस्थान ट्रस्टचे ‘ड्रग्ज’ कनेक्शनचे स्पष्टीकरण

2 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


नाशिकमधील जगप्रसिद्ध तीर्थक्षेत्र त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग मंदिर परिसरात भाविकाला सुरक्षा रक्षकांकडून मारहाण केल्याचे दोन व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने खळबळ उडाली आहे. या घटनेमुळे भाविकांमध्ये संतापाची लाट उसळली असतानाच, मंदिर प्रशासनाने यावर आपली बाजू मांडली असून संबंधित भाविक नशेत होता आणि त्यानेच आधी सुरक्षा रक्षकावर हल्ला केल्याचा दावा केला आहे. सध्या सलग सुट्ट्या असल्यामुळे त्र्यंबकेश्वरमध्ये दर्शनासाठी मोठी गर्दी होत आहे. व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये, दर्शन रांगेत उभ्या असलेल्या एका भाविकाला सुरक्षा रक्षक लाथाबुक्क्यांनी मारहाण करताना दिसत आहेत. धक्काबुक्कीत संबंधित भाविकाचे कपडेही फाटले असून, उपस्थित इतर भाविकांनी हा सर्व प्रकार मोबाईलमध्ये टिपला. या व्हिडिओमुळे सोशल मीडियावर मंदिर प्रशासनाच्या कारभारावर आणि सुरक्षा रक्षकांच्या उद्धट वर्तनावर टीकेची झोड उठली होती. देवस्थान ट्रस्टचा दावा: भाविक होता नशेत या प्रकरणावर स्पष्टीकरण देताना देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त कैलास घुले यांनी वेगळीच माहिती दिली आहे. त्यांच्या दाव्यानुसार, हा भाविक पहाटे पावणे सहाच्या सुमारास मंदिरात आला होता. तो दर्शन बारीत एक तास ध्यान लावून बसल्याने गर्दीचा अडथळा निर्माण झाला होता. सुरक्षा रक्षकांनी त्याला बाजूला केल्यानंतर त्याने नियम मोडून आणि परंपरेनुसार ‘सोवळे’ न नेसता थेट गाभाऱ्यात घुसण्याचा प्रयत्न केला. घुले यांनी पुढे सांगितले की, सुरक्षा रक्षकाने त्याला हटकले असता त्याने शिवीगाळ करत सुरक्षा रक्षकाचा गळा आवळण्याचा प्रयत्न केला. यामध्ये एका रक्षकाच्या डोळ्याला दुखापत झाली. त्यानंतर बचावासाठी इतर रक्षकांनी त्याला चोप देऊन बाहेर काढले. तरुणाने मागितली माफी या राड्यानंतर विश्वस्तांनी संबंधित तरुणाची चौकशी केली असता, त्याने अमली पदार्थांचे (ड्रग्ज) सेवन केल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. तात्काळ पोलिसांना पाचारण करण्यात आले. पोलिसांनी त्याची चौकशी केली असता, तो एका सुशिक्षित कुटुंबातील मुलगा असल्याचे स्पष्ट झाले, मात्र नशेत असल्याने त्याने हे कृत्य केल्याचे समोर आले. अखेर त्या तरुणाने आपल्या वर्तनाबद्दल लेखी माफी मागितली असून, त्यानंतर हे प्रकरण निस्तरले आहे, असेही घुले यांनी सांगितले. हे ही वाचा… होळीच्या दिवशी घृष्णेश्वर मंदिर दर्शनवेळेत बदल:चंद्रग्रहणामुळे चार तास राहणार बंद, सायंकाळी 7 नंतर खुले होणार बारावे ज्योतिर्लिंग म्हणून प्रसिद्ध असलेले घृष्णेश्वर मंदिर येथे ३ मार्च २०२६ (मंगळवार) रोजी होणाऱ्या खग्रास चंद्रग्रहणाच्या पार्श्वभूमीवर दर्शनवेळेत बदल करण्यात आला आहे. दुपारी ३ ते सायंकाळी ७ या चार तासांच्या कालावधीत मंदिर भाविकांसाठी बंद राहणार आहे. सविस्तर वाचा…

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर