मारेगावकरांचे स्वप्न होणार पूर्ण

प्रस्तावित बसस्थानकासाठी अडीच कोटी मंजूर आमदार संजीव रेड्डी बोदकूरवार यांच्या प्रयत्नांना यश सुरेश पाचभाई मारेगाव, मारेगाव तालुक्यात बहुप्रतिक्षित असलेले बस स्थानक अखेर पूर्ण होण्याच्या मार्गावर आहेत.बस स्थानकासाठी अडीच कोटीचा निधी मंजूर झाला असून त्यातील पहिला हप्ता 20 टक्के रक्कम ही बस स्थानक प्रशासनाकडे सुपूर्द केल्याची माहिती वणी विधानसभा क्षेत्राचे आमदार संजीव रेड्डी बोदकूरवार यांनी दिली. … Read more

भरधाव वेगातील कारचे नियंत्रण सुटल्याने कार पलटी दोन जखमी

करणवाडी जवळील घटना गजानन आसुटकर मारेगांव, मारेगाव तालुक्यातील करणवाडी ते नवरगाव रस्त्यावर करणवाडी गावापासून अवघ्या अर्ध्या किलोमीटर अंतरावर भरधाव वेगातील कारचे नियंत्रण सुटल्याने पलटी झाली.यात कार चालकासह बाजूला बसलेली मुलगी जखमी झाल्याची घटना आज दिनांक ३ मार्च २०२४ रोज रवीवारला दुपारी ३ वाजताचे दरम्यान  घडली. विवेक बाळकृष्ण बोरपे वय अंदाजे 31 वर्ष रा.ता.वरोरा जि.चंद्रपूर असे … Read more

जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून ‘सन्मान स्त्री शक्तीचा जागर कर्तृत्वाचा

– मारेगाव येथील मैत्री कट्टा ग्रुपच्या वतीने आयोजन सुरेश पाचभाई मारेगाव, जागतिक महिला दिना निमित्त दि.8,9 व 10 मार्चला विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.व महिलांचा सत्काराचे आयोजन करण्यात आले आहे.महिलांच्या सामजिक उत्थानासाठी सदैव अग्रेसर असलेल्या मारेगाव मैत्री कट्टा ग्रुपच्या वतीने 8 मार्चला दुपारी 2 वाजता प्रसिद्धीच्या प्रवाहात नसलेल्या परंतु सकारात्मक कार्य करणाऱ्या कर्तुत्वान नोंदणीकृत … Read more

श्री.कृष्ण तुळशी वृंदावन देवस्थान नवरगाव (धरण) येथे भव्य यात्राचे आयोजन

दिनांक १४ मार्चला रोज गुरुवारला दुपारी १ वाजता करण्यात येणार गोपाल काला यात्रेमध्ये भव्य शंकरपटाचे आयोजन करण्यात आले आहे सुरेश पाचभाई मारेगाव, मारेगाव:तालुक्यातील नवरगाव (धरण)येथे प्रसिद्ध श्री तुळशी वृंदावन मंदिर आहे.दरवर्षी प्रमाणे याही वर्षी दिनांक ८ मार्च २०२४ रोज शुक्रवारला महाशिवरात्रीच्या दिवशी या मंदिरात घटस्थापना करण्यात येणार असुन दिनांक १४ मार्च २०२४ रोज गुरुवारला दुपारी … Read more

मारेगांवचे नवे ठाणेदारपदी पो.नि.शंकर पांचाळ यांची नियुक्ती

– आज पासुन त्यांचे कडे मारेगांव चे ठाणेदार पदाचे सूत्र– ठाणेदार जनर्धन खंडेराव यांची वाशिम येथे बदली सुरेश पाचभाई मारेगांव, मारेगावचे ठाणेदार जनर्धन खंडेराव यांची वाशिम येथे प्रशासकीय बदली करण्यात आली असून ते मारेगांव पोलीस स्टेशनला आठ महिणे कार्यरत होते.उमरखेड शहरचे ठाणेदार शंकर पांचाळ यांची मारेगाव पोलीस स्टेशनला बदली करण्यात आल्यामुळे पो.नि.शंकर पांचाळ हे आता … Read more

कुणी मदत देता का मदत,अपंग पती-पत्नीचा आर्त टाहो

सुरेश पाचभाई मारेगाव, पती जन्मापासून अपंग,पत्नी ही शारीरिक अपंग,दोघांनाही जगण्यासाठी साधन नाही,दोघांकडूनही मजुरीचे काम होत नाही,अशा अवस्थेत जगायचे कसे? असा प्रश्न या दाम्पत्यांपुढे निर्माण झाल्यामुळे यांच्या संसाराची वाताहत तर होणार नाही ना अशी अवस्था निर्माण झालेली आहे. अशा अवस्थेत या अपंगांनी कोणी मदत देता का मदत असा आर्त टाहो फोडला.यांची परिस्थिती पाहून ह्रदय हेलावून टाकल्याशिवाय … Read more

रेती तस्करांचे गुप्तहेर पोलिसांच्या रडारवर

तहसीलदाराच्या तक्रारीने हेरांचे धाबे दणाणले सुरेश पाचभाई मारेगाव, रेती माफिया तसेच तस्करांना मदत करणाऱ्या त्यांच्या गुप्तहेरांवर कारवाई करण्यात यावी यासंबंधीची तक्रार मारेगावचे तहसीलदार उत्तम निलावाड यांनी पोलीस स्टेशनला दिली आहे. मारेगाव तालुक्यात मोठ्या प्रमाणात रेतीची तस्करी होत असते.आजपर्यंत अनेक रेती तस्करी करणाऱ्या वाहनांवर मारेगाव तहसीलदार तसेच त्यांच्या टीमने कारवाई केलेली आहेत. सततच्या कारवाया होत असून सुद्धा … Read more

भरधाव दुचाकीची उभ्या ट्रकला मागुन धडक एक गंभीर जखमी

खडकी बस स्टॉप जवळील घटना सुरेश पाचभाई मारेगांव, बोटोणी येथील लग्न समारंभ आटोपून आपल्या गावी सैदाबाद (कायर) येथे परत जात असतांना खडकी फाट्याजवळ रस्त्याच्या बाजूला उभ्या ट्रकला मागुन दुचाकीने जबर धडक दिली.यात दुचाकीस्वार चालक गंभीर जखमी झाल्याची घटना आज दि.२८ फेब्रुवारी २०२४ रोज बुधवारला सायंकाळी ७:३० वाजताच्या सुमारास घडली. अपघातात जखमी झालेल्या युवकाचे नाव मंगेश … Read more

रेतीची अवैध तस्करी करणारा ट्रॅक्टर व जेसीबी जप्त

महसूल विभागाची धडाकेबाज  कारवाई सुरेश पाचभाई मारेगांव, मारेगाव: तालुक्यातील रेती घाटातुन अवैधपणे रेतीची मोठया प्रमाणावर तस्करी राजरोसपणे सुरु आहे. यावर वारंवार आळा घालण्याचे प्रयत्न सुरु आहे.परंतु मुजोर रेतीचोर मात्र प्रशासनाला न जुमानता रेती तस्करी करीत आहे. अशातच आज दिनांक २७ फेब्रुवारी २०२४ च्या मध्यरात्री  २: ३० वाजताच्या दरम्यान महसूल प्रशासनाने अवैध रेतीची वाहतूक करणारा एक  … Read more

बुरांडा ते खापरी रस्ता मोजतोय अखेरची घटका

– रस्त्यात गिट्टीचे व खड्याचे साम्राज्य– अर्धवट कामामुळे खापरी ग्रामस्थ त्रस्त– लोकप्रतिनिधीचे दुर्लक्ष सुरेश पाचभाई मारेगांव, मागील अनेक वर्षांपासून नरकयातना भोगत असलेला बुरांडा ते खापरी या रस्त्याचे काम अजूनही अर्धवटच आहे. या रस्त्यावरील गिट्टी पूर्णपणे उखळून असल्याने येथील नागरिकांना या रस्त्याने चालतांना नरकयातनाच भोगत असल्याचा भास होत आहे. स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सव वर्षातही नागरिकांचे हाल मात्र कमी … Read more

error: Content is protected !!