मारेगाव येथे ज्येष्ठ नागरिक भवनाचा लोकार्पण सोहळा.

आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांची प्रमुख उपस्थिती. सुरेश पाचभाई मारेगाव : येथील ज्येष्ठ नागरिक भवनाचा लोकार्पण सोहळा वणी विधानसभा क्षेत्राचे आमदार संजीव रेड्डी बोदकुरवार यांचे हस्ते संपन्न झाला. श्री.सद्गुरू जगन्नाथ महाराज ज्येष्ठ नागरिक मंडळातर्फे आयोजित या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी मारेगाव नगरपंचायतचे अध्यक्ष डॉ.मनिष मस्की, उदघाटक म्हणून आमदार संजीव रेड्डी बोदकुरवार,प्रमुख अतिथी म्हणून सौ.इंदुताई किन्हेकर माजी नगराध्यक्षा,शंकरराव मडावी, … Read more

शिवजयंतीनिमित्त हिवरी गावातील युवकांनी ठेवला समाजासमोर आदर्श.

देशाच्या अमृत महोत्सवाचे औचित्य साधून गावातील ७५ वर्षाच्या नागरिकांचा केला सत्कार. शिवप्रतिष्ठान हिवरी यांचे वतीने उत्कृष्ट उपक्रम राबविन्यात आला. सुरेश पाचभाई मारेगाव:- देशाच्या अमृत महोत्सवाचे औचित्य साधून हिवरी गावातील युवकांनी शिवजयंती निमित्त गावातील 75 वर्षाच्या नागरिकांचा सत्कार करून समाजापुढे आदर्श निर्माण केला आहे. देशात विविध क्षेत्रामध्ये नाविन्य प्राप्त असलेल्या नागरिकांचा सत्कार होत असतो परंतु देशाचा … Read more

बुरांडा (ख) येथे छत्रपती शिवाजी महाराज जयंती मोठ्या उत्सवात साजरी.

ढोल ताशांच्या गजरात काढली गावातुन भव्य मिरवणूक. शिवजन्मोत्सव ‘नवयुवक मंडळ व नवयुवक बौद्ध मंडळ, बुरांडा (ख) यांचे संयुक्त विद्यमाने शिवजयंती साजरी. सुरेश पाचभाई मारेगांव: तालुक्यातील बुरांडा(ख)येथे आज दिनांक १९ फेब्रुवारी २०२३ रोज रविवारला छत्रपती शिवाजी महाराज जयंती मोठ्या उत्सवात साजरी करण्यात आली.काल दिनांक १८ फेब्रुवारी २०२३ रोज शनिवारला रात्री ८ वाजता किर्तनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात … Read more

विक्रमवीर मनस्वीचे बोटोणी येथे भव्य स्वागत.

** ढोल ताशांच्या गजरात काढली भव्य मिरवणूक ** ##आज होणार बोटोणी येथे फायर बार स्केटिंग प्रात्यक्षिक रोड शो ## सुरेश पाचभाई मारेगांव: स्केटिंगमध्ये वेगवेगळे विक्रम स्वतःच्या नावावर करीत गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड प्रस्थापित करणाऱ्या मनस्वी पिंपरेचे मारेगाव तालुक्यातील बोटोनी येथे आगमन होताच परंपरागत बैलबंडीवर मिरवणूक काढत भव्य स्वागत करण्यात आले.आणि आज दि.18 फेब्रुवारी रोज … Read more

मार्डी येथे 12 वीच्या विद्यार्थ्यांना निरोप.

भावपुर्ण नयणांनी घेतला शाळेचा निरोप. सुरेश पाचभाई मारेगांव: मार्डी येथील आदर्श कला उच्च माध्यमिक विद्यालय येथे वर्ग 12 वीच्या विद्यार्थ्यांना साश्रू नयणांनी निरोप दिला.यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून प्राचार्य विलास ताजने,प्रमुख पाहुणे म्हणून माजी प्राचार्य भास्करराव धानफुले,सरपंच रविराज चंदनखेडे,पोलीस पाटील डॉ.प्रशांत पाटील,जगन भोंगळे,रमेश ढूमणे,भास्कर राऊत,सुरेश नाखले,एकनाथ येटी,ज्ञानेश्वर दातारकर,कु.नीतू मेश्राम होते. यावेळी विद्यार्थ्यांनी आपली मनोगते व्यक्त करीत … Read more

कापसाला प्रतिक्विंटल 10 हजार रुपये भाव द्यावा या मागणीसाठी शिवसेनेचा चक्काजाम.

करणवाडी फाट्याजवळ काल चक्काजाम आंदोलन करण्यात आले. सुरेश पाचभाई मारेगांव: तालुक्यातील करणवाडी फाट्याजवळ काल शेतकऱ्यांची होत असलेली पिळवणूक थांबवून कापसाला प्रतिक्विंटल 10 हजार रुपये भाव देण्यात यावा या प्रमुख मागणीसाठी शिवसेना तालुका प्रमुख संजय आवारी यांच्या नेतृत्वात (ठाकरे गट) दिनांक 15 फेब्रुवारी 2023 रोज दुपारी 1 वाजताच्या सुमारास वणी-यवतमाळ राज्य महामार्गावरील करणवाडी फाट्याजवळ चक्काजाम करण्यात … Read more

कला वाणिज्य व विज्ञान क. महाविद्यालय मारेगाव येथे बारावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ संपन्न.

सुरेश पाचभाई मारेगांव: कला वाणिज्य व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय मारेगाव येथे काल दिनांक 15 फेब्रुवारी 2023 रोज बुधवारला वर्ग 12 वि कला वाणिज्य, व विज्ञान शाखेमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी निरोप समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. या निरोप समारंभ कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून शेतकरी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष जिवन पाटील कापसे उपस्थित होते.तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून महाविद्यालयाचे प्राचार्य हेमंत … Read more

बोटोणी येथे भव्य छत्रपती शिवाजी महाराज जयंती दोन दिवसीय उत्सवाचे आयोजन.

सुरेश पाचभाई मारेगांव: बोटोणी येथे छत्रपती युवा शक्ती प्रतिष्ठान यांच्या वतीने दोन दिवसीय भव्य छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सवानिमित्त दिनांक 18 फेब्रुवारी 2023 रोज शनिवारला सायंकाळी 6 वाजता” विक्रमवीर मनस्वी पिंपरे “हीचे फायर बार स्केटिंग प्रात्यक्षिक रोड शो ग्रामीण भागातील विद्यार्थ्याना प्रोत्साहित करण्यासाठी आणि संदीप पाल महाराज (सत्यपाल महाराज यांचे शिष्य) यांचे जाहीर कीर्तन संध्याकाळी … Read more

मारेगांव पोलीस स्टेशन येथे शांतता समितीची सभा संपन्न.

सुरेश पाचभाई मारेगांव:आज दिनांक 15 फेब्रुवारी 2023 रोजी बुधवारला सायंकाळी 5:30 ते 6:30 वाजताच्या सुमारास पोलीस स्टेशन मारेगांव येथे आगामी महाशिवरात्री व छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्ताने पोलीस स्टेशन परिसरातील शांतता समिती सदस्य,महाशिवरात्री मंदिर समिती पदाधिकारी, शिवाजी महाराज जयंती समिती पदाधिकारी यांची संजय पुजलवार,उपविभागीय पोलिस अधिकारी वणी व ठाणेदार राजेश अ.पुरी पोलीस स्टेशन मारेगाव यांचे … Read more

व्हॅलेंटाईन डे लाच प्रियकराला अटक.

लग्नाचे आमिष देऊन शोषण केल्याची तक्रार. सुरेश पाचभाई मारेगांव:नातेवाईकांच्या घराजवळ राहणाऱ्या एका मुलीला लग्नाचे आमिष देऊन लैंगिक शोषण केले.चार वर्षानंतर जेव्हा मुलीने लग्नाची गळ घातली तेव्हा मुलाने चक्क हात वर केले.त्यामुळे खोट्या प्रेमाच्या आणाभाकांना कंटाळलेल्या मुलीने अखेर मारेगांव पोलीस ठाणे गाठत तक्रार दाखल केली. मारेगांव येथील एका 23 वर्षीय युवतीचे व गणेशपूर (वणी) येथील 24 … Read more

error: Content is protected !!