पं.स.ची वार्षिक आमसभा संपन्न

विविध मुद्यांवर वादळी चर्चा सुरेश पाचभाई / मारेगाव मारेगाव पंचायत समितीच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही वार्षिक आमसभा तथा सरपंच परिषद आयोजित करण्यात आली होती. बदकी भवन येथे पार पडलेल्या या सभेच्या अध्यक्षस्थानी वणी विधानसभा मतदारसंघाचे आमदार संजयभाऊ देरकर होते. या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून तहसीलदार उत्तमराव निलावाड, गटविकास अधिकारी भिमराव व्हनखंडे, माजी जि.प. सभापती अरुणाताई खंडाळकर, … Read more

प्रशासनाला अखेर खडबडून आली जाग

विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्कच्या बातमीचा मोठा इफेक्ट करणवाडी–खैरी रस्त्याच्या दुरुस्तीला सुरुवात सुरेश पाचभाई | मारेगाव मारेगाव तालुक्यातील करणवाडी–कुंभा ते खैरी या अत्यंत महत्त्वाच्या रस्त्याच्या दयनीय अवस्थेबाबत विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्कने “करणवाडी–खैरी रस्ता मोजतोय अखेरची घटका” ही बातमी प्रसिद्ध केल्यानंतर अखेर प्रशासन हालचालीत आले असून, संबंधित रस्त्याच्या दुरुस्ती व खड्डे बुजवण्याच्या कामाला सुरुवात करण्यात आली आहे. … Read more

दत्तकग्राम मांगरूळ येथे रासेयोचे विशेष श्रमसंस्कार शिबिर उत्साहात संपन्न

सुरेश पाचभाई / मारेगाव मारेगाव: कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, मारेगाव येथील राष्ट्रीय सेवा योजनेचे सात दिवसीय विशेष श्रमसंस्कार शिबिर दिनांक 27 जानेवारी 2026 ते 02 फेब्रुवारी 2026 पर्यंत दत्तकग्राम मांगरूळ येथे आयोजित करण्यात आले. शाश्वत  विकासासाठी युवा: पाणलोट व्यवस्थापन आणि पडीक जमीन विकास हे शिर्षक साध्य करत सदर शिबीर नाविन्यपूर्ण उपक्रमांनी वैशिष्ट्यपूर्ण ठरले. घनकचरा … Read more

मारेगावात महाशिवरात्री निमित्त भव्य हवन व रुद्राभिषेक सोहळ्याचे आयोजन

वृंदावन येथील विद्वानांच्या उपस्थितीत रंगणार आध्यात्मिक सोहळा सुरेश पाचभाई मारेगाव मारेगाव येथील प्रसिद्ध हुडकेश्वर देवस्थान येथे महाशिवरात्री उत्सवाचे औचित्य साधून रविवार, दिनांक १५ फेब्रुवारी २०२६ रोजी भव्य हवन पूजन व रुद्राभिषेक सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही हा सोहळा अत्यंत उत्साहात आणि शास्त्रोक्त पद्धतीने पार पडणार असून, यासाठी वृंदावन (मथुरा) येथील सुप्रसिद्ध विद्वान उपस्थित … Read more

आनंद हेच जीवनाचे अंतिम ध्येय असावे

प्रा. दिलीप अलोने यांचे मार्डी येथील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन सुरेश पाचभाई / मारेगाव आनंद हेच जीवनाचे अंतिम ध्येय असावे. जीवन कसे असावे यापेक्षा विद्यार्थ्यांनी आनंददायी जीवन जगण्यावर भर द्यावा. निरपेक्ष, निर्विकार आणि दुसऱ्याला दुःखी न करता मिळणारा आनंद हाच खरा आनंद आहे, असे प्रतिपादन प्रा. दिलीप अलोने यांनी केले. ते मार्डी येथील आदर्श हायस्कूल तथा कला … Read more

बोटोणी येथे राष्ट्रीय अन्न सुरक्षा व गलितधान्य योजनेंतर्गत शेतकरी प्रशिक्षण संपन्न

सुरेश पाचभाई मारेगाव मारेगाव तालुक्यातील बोटोणी येथे दिनांक २४ जानेवारी २०२६ रोजी जगन्नाथ मंदिर सभागृहात तालुका कृषी अधिकारी कार्यालय, मारेगाव यांच्या वतीने राष्ट्रीय अन्न सुरक्षा व गलितधान्य योजनेंतर्गत शेतकरी प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. हा कार्यक्रम तालुका कृषी अधिकारी कु. दीपाली खवले व मंडळ कृषी अधिकारी श्री. किशोर डोंगरकर यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाला. प्रशिक्षणात शेतकऱ्यांना … Read more

प्रशिक्षणातून फळबाग व बांबू लागवडीसाठी प्रबोधन

कृषि विभागाचा उपक्रम सुरेश पाचभाई मारेगाव मारेगाव: तालुक्यातील वेगाव (मठ) येथे राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान अंतर्गत शेतकरी प्रशिक्षण नुकतेच संपन्न झाले. कृषि विभागामार्फत आयोजित या शेतकरी प्रशिक्षणात प्रमुख मार्गदर्शक म्हणून प्रगतीशील शेतकरी कैलास डोंगरकर यांची प्रमुख उपस्थिती लाभली. कृषि विभागाच्या विविध योजना, महाविस्तार AI app व कार्यक्रमाची रूपरेषा याबाबत तालुका कृषि अधिकारी दिपाली खवले यांनी … Read more

सरपंचांनी दिला नवनियुक्त निरीक्षकांना ध्वजारोहणाचा मान

देशभरात ७७ वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा होत असताना सुरेश पाचभाई | मारेगाव मारेगाव तालुक्यातील बोरी (गदाजी) गावात एक आगळा-वेगळा आणि प्रेरणादायी उपक्रम राबविण्यात आला. नेहमीप्रमाणे सरपंचांकडून ध्वजारोहण न करता, गावचे भूषण ठरलेल्या नवनियुक्त शासकीय अधिकाऱ्याला हा मान देत ग्रामपंचायतीने समाजापुढे आदर्श ठेवला. बोरी (गदाजी) येथील कन्या दर्शना उत्तम पिंपळकर हिने नुकतीच एम.पी.एस.सी. स्पर्धा परीक्षा … Read more

कोसारा येथे १६ वे श्रीमद् भागवत कथा व ज्ञानयज्ञ सप्ताह उत्साहात

सुरेश पाचभाई मारेगाव मारेगाव तालुक्यातील कोसारा येथील श्री हनुमान मंदिर, विठ्ठल-रुख्मिणी मंदिर व श्री संत नानाजी महाराज मंदिराच्या भव्य पटांगणात मिती माघ शुद्ध ७, रविवार दि. २५ जानेवारी २०२६ ते मिती माघ पौर्णिमा, रविवार दि. १ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत १६ वे श्रीमद् भागवत कथा व ज्ञानयज्ञ सप्ताह मोठ्या भक्तिभावाने आयोजित करण्यात आला आहे. या … Read more

करणवाडी–खैरी रस्ता मोजतोय अखेरची घटका

नवीन रस्त्यावर दीड ते साडेतीन फुटांचे खड्डे; अपघातांना खुले आमंत्रण सुरेश पाचभाई / मारेगाव मारेगाव तालुक्यातील कुंभा ते खैरी (करणवाडी–खैरी) या अत्यंत महत्त्वाच्या रस्त्याचे काम नुकतेच पूर्ण झाले असताना अवघ्या काही दिवसांतच या रस्त्याची अवस्था अत्यंत दयनीय बनली आहे. रस्ता आहे की खड्ड्यांची माळ, असा संतप्त सवाल आता नागरिक उपस्थित करीत आहेत. कुंभा व महादापेठ … Read more

error: Content is protected !!