मारेगाव तालुक्यात जाणवले सौम्य भूकंपाचे धक्के

तालुक्यातील कुंभा,चिंचाळा व मंगरूळ परिसरात जाणवले धक्के सुरेश पाचभाई मारेगाव मारेगाव तालुक्यात काल रात्रीची वेळ होती, 10.30 ते 11च्या दरम्यान ची वेळ. सर्वजण आपापल्या घरी शांततेने झोपलेले होते. अशातच एकाएकी जोराचा धक्का जाणवला. अनेकांना काय झाले कळलेच नाही आणि भीतीने आपल्या घराच्या बाहेर निघाले. ज्यांचे टीन आणि कौलांचे घर होते, त्यांच्या टीनांचा आवाज आला. काहींच्या … Read more

महिलेची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या

बुरांडा (ख) येथील घटना मृत्यूचे कारण अस्पष्ट सुरेश पाचभाई मारेगाव मारेगाव तालुक्यातील बुरांडा (ख) येथील एका 45 वर्षीय महिलेने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज दिनांक 13 फेब्रुवारी 2025 रोज गुरूवारला सकाळी 6 वाजताच्या दरम्यान उघडकीस आली.मंदा आनंद ताकसांडे वय अंदाजे 45 वर्ष रा.बुरांडा (ख)असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे. 45-year-old woman from Buranda … Read more

हाच तो रस्ता गेल्या 20 वर्षापासून विकासा पासून कोसो दूर

बुरांडा ते खापरी रस्ता मोजतोय अखेरची घटका – रस्त्यात गिट्टीचे व खड्याचे साम्राज्य– अर्धवट कामामुळे खापरी ग्रामस्थ त्रस्त– गेल्या 20 वर्षा पासून लोकप्रतिनिधीचे कायम दुर्लक्ष सुरेश पाचभाई मारेगाव मागील अनेक वर्षांपासून नरकयातना भोगत असलेला बुरांडा ते खापरी या रस्त्याचे काम अजूनही अर्धवटच आहे.या रस्त्यावरील गिट्टी पूर्णपणे उखळून असल्याने खड्ड्याचे साम्राज्य असल्याने येथील नागरिकांना या रस्त्याने … Read more

35 वर्षीय शेतकऱ्याची कीटकनाशक प्राशन करून आत्महत्या.

तालुक्यातील केगांव येथील घटना सुरेश पाचभाई मारेगाव मारेगाव तालुक्यातील केगाव येथील अल्पभूधारक शेतकऱ्याने स्वतःच्या शेतात कीटकनाशक प्राशन करून आपली जीवनयात्रा संपविल्याची घटना आज दिनांक 11 फेब्रुवारी 2025 रोज मंगळवारला सकाळी 9:30 वाजता उघडकीस आली. पवन आण्याजी पिंपळशेंडे वय अंदाजे 35 वर्षे असे विषारी कीटकनाशक प्राशन करून आत्महत्या केलेल्या अल्पभूधारक शेतकऱ्याचे नाव आहे. पवन याचे कडे … Read more

मुख्याधिकारी आपल्या दारी” मारेगाव नगरपंचायतचा उपक्रम

प्रत्यक्ष भेटून जनतेच्या समस्या घेतल्या जाणून सुरेश पाचभाई मारेगाव मारेगाव नगर पंचायतयचे मुख्याधिकारी( गट अ) श्री.शशिकांत मा. बाबर (म.श.प्र.से) नगरपंचायत मारेगाव यांच्या संकल्पनेतून “मुख्याधिकारी आपल्या दारी” ह्या अभिनव उपक्रमास सुरवात करण्यात आली असुन सदर उपक्रमांतर्गत काल दिनांक 8 फेब्रुवारी 2025 रोज शनिवारला प्रभाग क्रमांक 10 मधील नागरिकांच्या समस्या मुख्याधिकाऱ्यांनी जाणून घेतल्या.तक्रारीची नोंद घेण्यात आली.व सदर … Read more

अवैध दारू विक्री बंद करण्यासाठी महिला धडकल्या पोलीस ठाण्यात

सिंधी येथील महिलांचे पोलीस उपनिरीक्षकांना निवेदन प्रमोद रा. मेश्राम मारेगाव गावात सुरू असलेली अवैध दारू विक्री बंद करण्यात यावी आणि या अवैध दारूपासून सिंधी येथील नागरिकांची सुटका करण्यात यावी अशा प्रकारचे निवेदन घेऊन सिंधी येथील महिला पोलीस ठाण्यात धडकल्या. त्यांनी पोलीस उपनिरीक्षक विकी जाधव यांना अवैध दारू विक्री बंदी बाबतचे निवेदन सादर केले. तालुक्यात अनेक … Read more

घोडदरा येथे राष्ट्रसंत श्री.तुकडोजी महाराज यांचा तीन दिवसीय 56 वा पुण्यस्मरण सोहळा

श्री.गुरुदेव सेवा मंडळ तथा श्री.गुरुदेव सेवा महिला मंडळ, घोडदरा यांचा पुढाकार सुरेश पाचभाई मारेगाव मारेगाव तालुक्यातील घोडदरा येथे आज दिनांक 8 फेब्रुवारी 2025 ते 10 फेब्रुवारी 2025 पर्यंत राष्ट्रसंत श्री.तुकडोजी महाराज यांच्या तीन दिवसीय 56 वा पुण्यस्मरण सोहळ्याचे आयोजन हनुमान मंदीर व राष्ट्रसंत तुकडोजी महाराज परिसरात, श्री गुरुदेव सेवा मंडळ तथा श्री.गुरुदेव सेवा महिला मंडळ, … Read more

सराटी येथे वार्षिक स्नेहसंमेलन व सांस्कृतिक कला महोत्सव संपन्न

सुरेश पाचभाई मारेगाव मारेगाव तालुक्यातील सराटी येथे दिनांक 5 फेब्रुवारी 2025 रोज बुधवारला वार्षिक स्नेहसंमेलन सांस्कृतिक कला व महोत्सव जि.प.उच्च प्राथमिक शाळा सराटी येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण कला गुणांना वाव मिळावा यासाठी जी. प.उच्च प्राथमिक शाळा सराटी नेहमी प्रयत्नाची पराकाष्ठा करत असते.याच अनुषंगाने दिनांक 5 फेब्रुवारी 2025 रोजी वार्षिक स्नेहसंमेलन व सांस्कृतिक … Read more

बंद हायमास्ट लाईटमुळे अपघातात वाढ

कडेला असलेल्या दुभाजकाला धडकतात वाहने संबंधीत विभागाचे दुर्लक्ष सुरेश पाचभाई मारेगाव, मारेगाव यवतमाळ राज्य महामार्गावरील करणवाडी जवळ असलेले हायमास्ट लाईट मागील 3 महिन्यापासून बंद आहे.रात्रीच्यावेळी नवीन या परिसरात नव्याने येणारे वाहनधारक यांना रस्त्याचा अंदाज नसल्याने अनेकवेळा वाहने रस्त्याच्या कडेलाच असलेल्या दुभाजकावर धडकत असल्याचे चित्र असून संबंधीत विभाग मात्र झोपेचे सोंग घेऊन असल्याचे दिसत आहे. मारेगाव … Read more

पोलीस हेडकॉन्स्टेबल अफजल शब्बीर पठाण यांचे दुःखद निधन

मारेगाव पोलीस स्टेशन येथे होते कार्यरत सुरेश पाचभाई मारेगाव मारेगाव पोलीस स्टेशन येथे कार्यरत असलेले पोलीस हेड कॉन्स्टेबल अफजल शब्बीर पठाण यांचा अल्पशा आजाराने मृत्यू झाला.ते 43 वर्षाचे होते.त्यांचेवर नागपूर येथील एका खासगी रुग्णालय येथे उपचार सुरु होते. अगदी मनमिळावु स्वभावाचे पोलीस हेड कॉन्स्टेबल अफजल शब्बीर पठाण हे गेल्या एक महिन्यापासून पोटाच्या आजाराणे ग्रस्त होते. … Read more

error: Content is protected !!