बुरांडा–खापरी रस्त्याची थट्टा : लोकप्रतिनिधींच्या दुर्लक्षामुळे ग्रामस्थ रस्त्यावर, विकास फक्त भाषणात!

सुरेश पाचभाई | मारेगाव स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवाचे ढोल वाजत असताना मारेगाव तालुक्यातील खापरी ग्रामस्थ मात्र आजही चिखल, खड्डे आणि उखडलेल्या रस्त्यांतून जीव मुठीत धरून प्रवास करत आहेत. बुरांडा–खापरी या अडीच किलोमीटरच्या एकमेव रस्त्याचा प्रश्न गेली अनेक वर्षे केवळ “मंजुरीत”च अडकलेला असून प्रत्यक्षात लोकप्रतिनिधींच्या उदासीनतेमुळे नागरिकांचे हाल थांबण्याचे नाव घेत नाहीत. सन २०२१–२२ मध्ये तब्बल १७ वर्षांनंतर … Read more

म्हैसदोडका येथे श्री तुकडोजी महाराज पुण्यस्मरण व सर्व संत स्मृतीदिन सोहळा संपन्न

सुरेश पाचभाई / मारेगाव मारेगाव तालुक्यातील म्हैसदोडका येथे ब्रह्मलीन वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज यांच्या ५७ व्या पुण्यस्मरणानिमित्त तसेच सर्व संत स्मृतीदिनानिमित्त दोन दिवसीय धार्मिक व सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. हा सोहळा शनिवार, दि. १७ जानेवारी २०२६ व रविवार, दि. १८ जानेवारी २०२६ रोजी हनुमान देवस्थान, म्हैसदोडका (ता. मारेगाव, जि. यवतमाळ) येथे उत्साहात … Read more

करणवाडीत अखंड श्रीकृष्ण कथा सप्ताहाचा आज तिसरा दिवस

सुरेश पाचभाई, मारेगाव मारेगाव तालुक्यातील करणवाडी नगरीत समस्त ग्रामवासीयांच्या वतीने अखंड श्रीकृष्ण कथा सप्ताह सोहळ्याचे भव्य आयोजन करण्यात आले असून आज या सोहळ्याचा तिसरा दिवस आहे. हा धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम दि. १६ ते २२ जानेवारी २०२६ या कालावधीत दररोज दुपारी १.०० ते ५.०० या वेळेत श्री. तात्याजी लटारी जिवतोडे यांच्या शेतात, जिल्हा परिषद शाळेसमोर, … Read more

प्रधानमंत्री जीवन ज्योती बीमा योजनेतून अवघ्या ७ दिवसांत २ लाखांचा धनादेश सुपूर्त

महाराष्ट्र ग्रामीण बँक शाखा मारेगाव यांच्या वतीने धनादेश सुपूर्त सुरेश पाचभाई मारेगाव मारेगाव : महाराष्ट्र ग्रामीण बँक शाखा मारेगाव यांच्या वतीने प्रधानमंत्री जीवन ज्योती बीमा योजनेअंतर्गत उल्लेखनीय कामगिरी करण्यात आली. शाखेतील खातेदार श्रीमती विद्या निळकंठ ताजने यांच्या आजाराने झालेल्या आकस्मिक मृत्यूनंतर, त्यांच्या विमा दाव्याची प्रक्रिया तत्काळ पूर्ण करून अवघ्या सात दिवसांत रुपये दोन लाखांचा धनादेश … Read more

प्रधानमंत्री जीवन ज्योती बीमा योजनेतून अवघ्या ७ दिवसांत २ लाखांचा धनादेश सुपूर्त

महाराष्ट्र ग्रामीण बँक शाखा मारेगाव यांच्या वतीने धनादेश सुपूर्त सुरेश पाचभाई मारेगाव मारेगाव : महाराष्ट्र ग्रामीण बँक शाखा मारेगाव यांच्या वतीने प्रधानमंत्री जीवन ज्योती बीमा योजनेअंतर्गत उल्लेखनीय कामगिरी करण्यात आली. शाखेतील खातेदार श्रीमती विद्या निळकंठ ताजने यांच्या आजाराने झालेल्या आकस्मिक मृत्यूनंतर, त्यांच्या विमा दाव्याची प्रक्रिया तत्काळ पूर्ण करून अवघ्या सात दिवसांत रुपये दोन लाखांचा धनादेश … Read more

सगणापूर येथे सार्वजनिक वाचनालयाचे उद्घाटन व ग्रामपंचायत भवनाचे भूमिपूजन

आमदार संजयभाऊ देरकर यांच्या हस्ते विकासकामांचा दुहेरी सोहळा सुरेश पाचभाई, मारेगाव मारेगाव तालुक्यातील सगणापूर येथे आज दि. १६ जानेवारी रोजी वणी विधानसभा क्षेत्राचे आमदार मा. श्री. संजयभाऊ देरकर यांच्या शुभहस्ते गावातील नूतन सार्वजनिक वाचनालयाचे उद्घाटन व लोकार्पण तसेच ‘राष्ट्रीय ग्रामस्वराज अभियान’ अंतर्गत नव्या ग्रामपंचायत भवनाचे भूमिपूजन उत्साहात पार पडले. या विकासकामांच्या दुहेरी सोहळ्यामुळे सगणापूर गावाच्या … Read more

तोतया पोलिसांकडून मारहाण व खंडणी

मारेगाव पोलिसांची सिनेस्टाईल कारवाई सुरेश पाचभाई मारेगाव मारेगाव तालुक्यातील लाखापुर येथे स्वतःला एलसीबीचे पोलीस असल्याचे भासवून एका शेतकऱ्यास मारहाण करून त्याच्या वडिलांकडून पैसे उकळल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी मारेगाव पोलिसांनी अवघ्या एका तासात सिनेस्टाईल पाठलाग करून तीन तोतया पोलिसांना चारचाकी कारसह अटक केली आहे. Impersonators posing as police officers beat and extorted … Read more

कुंकवाचे मोल जपणारी मायशक्ती

अठराविश्व दारिद्र्यावर मात करणारी शांताबाई गदाईंची संघर्षगाथा सुरेश पाचभाई मारेगाव मारेगाव: जीवन माणसाच्या संयमाची परीक्षा घेत असते आणि त्या परीक्षेत अनेकदा स्त्रीच खऱ्या अर्थाने उत्तीर्ण ठरते. मारेगाव येथील वर्दळीच्या रस्त्यावर रुग्णालयाच्या दारात फळांची टोपली मांडून संसार सावरणाऱ्या शांताबाई दशरथ गदाई (वय ५०) यांची कहाणी म्हणजे संघर्ष, त्याग आणि मायशक्तीचा जिवंत आदर्श आहे. सुमारे दहा वर्षांपूर्वी … Read more

मात्र ॲप्लिकेशनमध्ये १०० टक्के कुटुंब नोंदणी पूर्ण केल्याबद्दल आशा स्वयंसेविकेचा सत्कार

सुरेश पाचभाई मारेगाव मारेगाव तालुक्यातील टाकरखेडा येथील उपकेंद्र करणवाडी, प्राथमिक आरोग्य केंद्र वेगाव अंतर्गत कार्यरत असलेल्या आशा स्वयंसेविका सौ.गीताताई संजय जीवने यांनी मात्र ॲप्लिकेशनमध्ये १०० टक्के कुटुंब नोंदणी पूर्ण केल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला. या उल्लेखनीय कार्याबद्दल मा. तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संजय मडावी साहेब यांच्या हस्ते सौ.गीता संजय जीवने यांना पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन करण्यात … Read more

मार्डीत १५ जानेवारीपासून भव्य कबड्डी स्पर्धेचा रणसंग्राम

तीन लाखांची बक्षिसे सुरेश पाचभाई मारेगाव, मारेगाव तालुक्यातील मार्डी येथे १५ जानेवारीपासून न्यू फ्रेंड्स क्रीडा मंडळाच्या वतीने भव्य कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. जि. प. शाळेच्या मैदानावर ही स्पर्धा पार पडणार असून ओपन पुरुष गट, ६० किलो आतील पुरुष गट आणि महिला खुला गट अशा तीन गटांत सामने खेळविण्यात येणार आहेत. पुरुषांच्या ओपन गटात … Read more

error: Content is protected !!