बुरांडा (ख)येथील शेतकऱ्याच्या मुलाने घेतली उंच भरारी

हितेश हरिचंद्र ताकसांडे यांची प्रशासकीय अधिकारी म्हणून निवड सुरेश पाचभाई मारेगाव एका अल्पभूधारक शेतकऱ्याच्या मुलाने आपल्या परिस्थितीवर मात करीत 1) युनाइटेड इंडिया इन्शुरन्स मध्ये प्रशासकीय अधिकारी. 2)स्टेट बँक ऑफ इंडिया या राष्ट्रीयकृत बँकेमध्ये लिपिक.स्वतःला सिद्ध केलेले आहे. त्याच्या या यशाबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे. तालुक्यातील बुरांडा (ख) येथील हितेश हरिश्चंद्र ताकसांडे हा एका अल्पभूधारक शेतकऱ्यांचा … Read more

बुरांडा ते खापरी रस्ता मोजतोय अखेरची घटका

– रस्त्यात चिखलाचे गिट्टीचे व खड्याचे साम्राज्य– अर्धवट कामामुळे खापरी ग्रामस्थ त्रस्त– लोकप्रतिनिधीचे कायम दुर्लक्ष सुरेश पाचभाई संपादक:- विदर्भ एस.पी.न्युज नेटवर्क मारेगांव, मागील अनेक वर्षांपासून नरकयातना भोगत असलेला बुरांडा ते खापरी या रस्त्याचे काम अजूनही अर्धवटच आहे.या रस्त्यावरील गिट्टी पूर्णपणे उखळून असल्याने व चिखलाचे साम्राज्य असल्याने येथील नागरिकांना या रस्त्याने चालतांना नरकयातनाच भोगत असल्याचा भास … Read more

उपनिरीक्षक पांडुरंगजी कवरासे यांचा सेवापूर्ती सत्कार

सुरेश पाचभाई मारेगाव पोलीस विभागातून पस्तीस वर्ष अखंड सेवा केल्यानंतर दिनांक ३१ मे २०२४ रोजी नियत वयोमानाने सेवानिवृत झालेलेल पोलीस उपनिरीक्षक पांडूरंगजी कवरासे यांचा सेवापूर्ती सत्कार शाल श्रीफळ व भेटवस्तू देवून जेष्ठाकरीता क्रिडा व सामाजिक क्षेत्रात कार्य करणारी जिल्हयातील अग्रणी संस्था मास्टर्स ॲथलेटीक्स स्पोर्ट ॲन्ड वेलफेअर असोशिएशन यवतमाळ व दारव्हा यांच्या वतीने शिलाताई पेंडणेकर यांच्या … Read more

शेतकऱ्यांनी विविध योजनेतील अनुदानासाठी अर्ज करावेत

कृषी विभागाचे आवाहन सुरेश पाचभाई मारेगाव शेतकऱ्यांनी बियाणे,खते कीट,तसेच कीटकनाशक फवारणी सुरक्षा किट यासाठी अर्ज करण्याचे आवाहन मारेगाव तालुका कृषी विभागातर्फे करण्यात आलेले आहे. जिल्हा परिषद सेस फंड योजना 2024- 25,पंचायत समिती  मारेगाव,कृषी विभागातर्फे वेगवेगळ्या योजना शेतकऱ्यांसाठी राबविण्यात येतात. मागील वर्षी प्रमाणे याही वर्षी बियाणे खरेदी,खते किट तसेच  कीटकनाशक फवारणी सुरक्षा किट यासाठी सुद्धा अर्ज … Read more

शेतकऱ्यांचे प्रश्न न सुटल्यास मनसे स्टाईलने आंदोलन

मारेगाव येथील पत्रकार परिषदेत राजू उंबरकर यांनी केली घोषणा सुरेश पाचभाई मारेगाव, शेतकऱ्यांसमोर सध्या विविध समस्या आहे. त्या सुटण्याचे नाव घेत नाही. राजकीय नेते आणि प्रशासकीय अधिकारीसुद्धा त्यांच्या प्रश्नाची साधी दखलही घेत नाही. शेतकऱ्यांच्या समस्येकडे लक्ष दिले नाही तर मनसे स्टाईलने आंदोलन करू असा इशारा मनसेचे नेते राजू उंबरकर यांनी दिला.ते मारेगाव येथील विश्रामगृहामध्ये घेतलेल्या … Read more

दोन दुचाकींची समोरासमोर धडक : एक ठार चार गंभीर

सुरेश पाचभाई मारेगाव, मारेगाव तालुक्यातील दापोरा जवळील कोसारा फाट्याजवळ दोन दुचाकींची समोरासमोर धडक होऊन एक जण ठार तर,चार जण गंभीर जखमी झाल्याची घटना आज दिनांक १८ जून २०२४ रोज मंगळवारला रात्री 8 वाजताच्या सुमारास दापोरा च्या समोर सुदाम देव कोसारा फाट्यावर घडली. मिळालेल्या माहितीनुसार,विचोड बोरी येथील शंकर गमे (अंदाजे वय 35) आणि त्याचा सहकारी कुणाल … Read more

कोसारा(सोईट) येथे ५३ वर्षीय व्यक्तीची गळफास घेऊन आत्महत्या

सुरेश पाचभाई मारेगाव, मारेगाव तालुक्यातील शेवटच्या टोकाला असलेले गाव कोसारा (सोईट) येथील एका वृद्धाश्रमात गेल्या काही महिन्यांपासून कामावर असलेल्या राजेश पांडुरंग बुरबादे वय सुमारे ५३ वर्ष रा.ता.धामणगाव (रेल्वे) जि.अमरावती यांनी आश्रमाच्या मागच्या बाजूला असलेल्या कडू निंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज दिनांक १३ जून २०२४ रोज गुरुवारला सकाळी उघडकीस आली. सदर घटनेची माहिती … Read more

मान्सूनपूर्व पावसाने उडवली दाणादाण

अनेकांची घरे पडली तर इलेक्ट्रिक पोल आणि झाडे सुद्धा उन्मळून पडली सुरेश पाचभाई मारेगाव, मान्सूनपूर्व पावसाने तालुक्यातील अनेक गावांना तडाखा दिला. अनेकांची दाणादाण उडाली.यात हिवरी,अर्जुनी आणि गोधनी या गावांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहेत अनेकांचे घरे उडाले शेतातील जनावरे बांधण्याचे गोठे उडाले तर रस्त्यावरील विद्युत खांब आणि झाडे सुद्धा उन्मळून पडल्याचे चित्र तालुक्यात दिसून येत … Read more

छत्रपती शिवाजी महाराजानंतर आदर्श राज्यकारभार चालवणारी कुशल प्रशासक म्हणजे अहिल्यादेवी होळकर-विकास चिडे

⏹️ बोरी गदाजी येथे हर्षोउल्हासात साजरी झाली राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची 299 वी जयंती सुरेश पाचभाई मारेगाव, मारेगाव:छत्रपती शिवाजी महाराजानंतर आदर्श राज्यकारभार सांभाळणारी कुशल प्रशासक म्हणजे अहिल्यादेवी होळकर होय.अहिल्यादेवी ने राज्यकारभार चालवताना चरित्र जोपासले, महिलांची पहिली फौज निर्माण करणारी राणी म्हणजे अहिल्यादेवी तसेच स्वतःच्या मुलीचा आंतरजातीय विवाह करून आंतरजातीय विवाहाला प्रोत्साहन देण्याचे कार्य अहिल्यादेवी … Read more

स्केटिंग असोसिएशन ऑफ महाराष्ट्र तर्फे मनस्वी पिंपरे सन्मानित

सुरेश पाचभाई मारेगाव, कल्याण येथे स्केटिंग असोसिएशन ऑफ महाराष्ट्र आणि रोलर स्केटिंग फेडरेशन ऑफ इंडिया आयोजित सत्कार सोहळा नुकताच पार पडला, होता 2023 मध्ये झालेल्या 61 व्या नॅशनल स्केटिंग चॅम्पियनशिप मध्ये मेडल मिळविणाऱ्या  खेळाडू तथा सहभागी खेळाडू यांचा सन्मान करण्यात आला. मुळगाव चिं. बोटोणी,तालुका मारेगाव सध्या राहणार कोंढवा बुद्रुक , पुणे येथील मनस्वी विशाल पिंपरे … Read more

error: Content is protected !!