मुकटा येथील शेतकर्याच्या मुलीने JEE B.arch मध्ये मारली बाजी.

कु.प्रणाली विजय ढवस JEE B.arch परीक्षेत 99.73 % टाईल घेऊन देशातुन 47 वा नंबर. मारेगांव तालुका प्रतिनिधी:-सुरेश पाचभाई[9922862184] मारेगाव तालुक्यातील मुकटा येथील कु.प्रणाली विजय ढवस हिने JEE B arch परीक्षेत 99.73 % टाईल घेऊन देशातुन 47 वा नंबर.प्राप्त करून गावासह तालुक्याचे नाव सोनेरी अक्षरात कोरले आहे. कु.प्रणाली ही आनंद निकेतन महाविद्यालय वरोरा जिल्हा चंद्रपूर येथे … Read more

शेतकरी पुत्राची आत्महत्या.

समाजमन सुन्न, सतत राहायचा चिंतेत. सुरेश पाचभाई मारेगाव, पुणे येथे एका कंपनीमध्ये काम करणारा आणि गावामध्ये आईवडिलांच्या भेटीला आलेल्या एका शेतकरीपुत्राने विषारी औषधी घेऊन जीवन संपविले. समाजमन सुन्न करणारी ही घटना मारेगाव तालुक्यातील मुकटा येथे घडली. असून आत्महत्या करणाऱ्या शेतकरी पुत्राचे नाव प्रफुल उत्तम तुराणकर, 29 असे आहे.प्रफुल हा अविवाहित आहे. घरची हलाखीची परिस्थिती आणि … Read more

कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाने कायम राखली यशाची परंपरा.

कॉलेजची नंदिनी विजय बोबडे तालुक्यात प्रथम. सुरेश पाचभाई मारेगाव, दिनांक 25 मे 2023 रोजी महाराष्ट्र राज्य परीक्षा मंडळाने घेतलेल्या माहे.फेब/मार्च 2023 उन्हाळी बोर्डच्या परीक्षेच्या जाहीर झालेल्या निकालात कला,वाणिज्य,व विज्ञान क. महाविद्यालय मारेगावच्या विद्यार्थ्याने दैदीप्यमान यश संपादन केले. दरवर्षी प्रमाणे यावर्षी महाविद्यालयाची यशाची परंपरा कायम ठेवत वाणिज्य शाखेची विद्यार्थीनी कु.नंदिनी वि.बोबडे ही तालुक्यात प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण … Read more

हीवरी येथील शेतकर्याच्या मुलीने मारली बाजी.

बारावीच्या बोर्डाच्या परीक्षेत 82.17 % घेऊन तालुक्यातून अव्वल. कु.नंदिनी विजय बोबडे वाणिज्य शाखा मारेगाव तालुक्यातुन प्रथम82.00% कु. प्रांजली ना. गोवारकर कला शाखा मारेगांव तालुक्यातून द्वितीय 79.00 % मारेगांव तालुका प्रतिनिधी:- सुरेश पाचभाई[9922862184] मारेगाव तालुक्यातील हीवरी येथील कु.नंदिनी विजय बोबडे हिने बारावीच्या बोर्डाच्या परीक्षेत 82.17 % गुण प्राप्त करून गावासह तालुक्याचे नाव सोनेरी अक्षरात कोरले आहे.नंदिनी ही … Read more

बंद हायमॅक्स लाईटमुळे अपघातात वाढ.

कडेला असलेल्या दुभाजकाला धडकतात वाहने. संबंधीत विभागाचे दुर्लक्ष. सुरेश पाचभाई मारेगाव, मारेगाव यवतमाळ रोडवरील करणवाडी जवळ असलेले हायमॅक्स लाईट मागील एक महिन्यापासून बंद आहे. रात्रीच्यावेळी नवीन या परिसरात नव्याने येणारे वाहनधारक यांना रस्त्याचा अंदाज नसल्याने अनेकवेळा वाहने रस्त्याच्या कडेलाच असलेल्या दुभाजकावर धडकत असल्याचे चित्र असून संबंधीत विभाग मात्र झोपेचे सोंग घेऊन असल्याचे दिसत आहे. मारेगाव … Read more

बोटोनी येथील महिलांनी पकडली अवैध देशी दारू.

अवैध दारु विक्री विरोधात बोटोणी येथील महिलांनी दिले ठाणेदार यांना निवेदन. काही वेळातच महिलांनी पकडी अवैध देशी दारु. गजानन आसुटकर मारेगाव. बोटोणी येथे अनेक दिवसांपासून अवैध दारू विक्रेत्यांनी मोठ्या प्रमाणात धुमाकुळ घातला होता.दारुमुळे अनेकचे संसार उध्वस्त होताना दिसुन येत होते.तरीही या दारूच्या आहारी परिसरातील नागरिक मोठया प्रमाणात गेले होते.घरी वाढलेले भांडण तंटे पाहून अखेर महिलांनी … Read more

गोंडबुरांडा येथील नवविवाहितेची गळफास घेऊन आत्महत्या.

मारेगांव तालुक्यातील गोंडबुरांडा येथील घटना. गजानन आसुटकर मारेगाव, मारेगाव तालुक्यात आत्महत्येची सत्र सूरूच असताना आज दिनांक 20 मे 2023 रोज शनिवारला सायंकाळी 6:30 वाजताच्या सुमारास गोंडबुरांडा येथील येथील एका 21वर्षीय नवविवाहितेची स्वतःचा राहत्या घरी दोराच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकिस आली. नवविवाहितेच्या आत्महत्येने गावावर शोककळा पसरलेली आहे. मारेगांव तालुक्यातील गोंडबुरांडा येथील सौ.रीना सुनील … Read more

नवरगांव, पेंढरी सहकारी संस्थेचे पीक कर्ज वाटप.

जिल्हा मध्यवर्ती बँकेचे उपाध्यक्ष संजय देरकर यांची उपस्थिती. सुरेश पाचभाई मारेगांव, मारेगांव तालुक्यातील नवरगांव सहकारी संस्था तसेच पेंढरी आदिवासी सहकारी संस्थेचे खरीप पीक कर्ज वाटप यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे उपाध्यक्ष संजय देरकर यांच्या हस्ते करण्यात आले. सदर कार्यक्रम दिनांक:18/5/23 ला घेण्यात आला. दरवर्षी नवरगांव तसेच पेंढरी सहकारी संस्थेतर्फे पात्र शेतकऱ्यांना पीक कर्जाचे वाटप करण्यात … Read more

जिवंत विद्युत प्रवाहाच्या धक्याने चिंचाळा येथील बैलजोडी ठार.

मारेगांव तालुक्यातील चिंचाळा येथील घटना. गजानन आसुटकर मारेगाव, नाल्यातील पाण्यातून बैलबंडी घरी नेत असतांना त्या पाण्यात असलेल्या जीवंत कृषि पंप एल टी लाईनच्या विजेच्या धक्याने बैलजोडी जागीच ठार झाली. ही घटना तालुक्यातील चिंचाळा येथे आज दिनांक 14 मे 2023 रोज रविवारला सकाळी 11 वाजताच्या सुमारास घडली. मारेगांव तालुक्यातील चिंचाळा येथे गावाला लागूनच नावडे यांच्या शेता … Read more

उभ्याट्रकला दुचाकीची धडक एक जण गंभीर जखमी.

मारेगांव वणी मार्गावरील इंडियन पेट्रोल पंप जवळची घटना. गजानन आसुटकर मारेगांव, मारेगांव वणी मार्गावरील इंडियन पेट्रोल पंप जवळ उभ्या ट्रकला मागुन दुचाकीस्वाराने जोरदार धडक दिली. सदर घटना आज दिनांक 13 मे 2023 रोज शनिवारला रात्री 8:30 वाजताच्या समारास घडली. यामध्ये दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला आहे. आज मारेगांव येथे रात्री 8:30 सुमारास मारेगांव वणी मार्गावरील इंडियन … Read more

error: Content is protected !!