सरपंचांनी दिला नवनियुक्त निरीक्षकांना ध्वजारोहणाचा मान

देशभरात ७७ वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा होत असताना सुरेश पाचभाई | मारेगाव मारेगाव तालुक्यातील बोरी (गदाजी) गावात एक आगळा-वेगळा आणि प्रेरणादायी उपक्रम राबविण्यात आला. नेहमीप्रमाणे सरपंचांकडून ध्वजारोहण न करता, गावचे भूषण ठरलेल्या नवनियुक्त शासकीय अधिकाऱ्याला हा मान देत ग्रामपंचायतीने समाजापुढे आदर्श ठेवला. बोरी (गदाजी) येथील कन्या दर्शना उत्तम पिंपळकर हिने नुकतीच एम.पी.एस.सी. स्पर्धा परीक्षा … Read more

करणवाडी–खैरी रस्ता मोजतोय अखेरची घटका

नवीन रस्त्यावर दीड ते साडेतीन फुटांचे खड्डे; अपघातांना खुले आमंत्रण सुरेश पाचभाई / मारेगाव मारेगाव तालुक्यातील कुंभा ते खैरी (करणवाडी–खैरी) या अत्यंत महत्त्वाच्या रस्त्याचे काम नुकतेच पूर्ण झाले असताना अवघ्या काही दिवसांतच या रस्त्याची अवस्था अत्यंत दयनीय बनली आहे. रस्ता आहे की खड्ड्यांची माळ, असा संतप्त सवाल आता नागरिक उपस्थित करीत आहेत. कुंभा व महादापेठ … Read more

विहिरीत उडी घेत युवकाची आत्महत्या
कळंब येथील दुर्दैवी घटना

परिसरात हळहळ; पोलिसांकडून तपास सुरू कळंब | प्रतिनिधी : नितेश क्षीरसागर कळंब शहरात एका २२ वर्षीय युवकाने आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. ही घटना शनिवार, दिनांक २४ जानेवारी २०२६ रोजी सायंकाळच्या सुमारास उघडकीस आली. हेमंत पंडितराव येंगडे (वय २२, रा. वॉर्ड क्रमांक ३, कळंब) असे मृत युवकाचे नाव आहे. प्राथमिक माहितीनुसार सदर युवकाने आपल्या … Read more

साई विद्यालयाचा फ्लोअरबॉलमध्ये दबदबा कायम

विभागीय स्पर्धेत तिहेरी विजेतेपद; राज्यस्तरावर धडक नितेश क्षीरसागर तालुका प्रतिनिधी कळंब यवतमाळ, दि. 24 जानेवारी महाराष्ट्र शासनाच्या युवक व क्रीडा सेवा संचालनालय, पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय यवतमाळ व जिल्हा क्रीडा परिषद यवतमाळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित अमरावती विभागीय शालेय फ्लोअरबॉल क्रीडा स्पर्धेत श्री साई विद्यालय, लोहारा (ता. जि. यवतमाळ) यांनी नेत्रदीपक कामगिरी करत … Read more

कळंब अंबिका नगर येथे ग्रामसेवक युवकाची गळफास घेऊन आत्महत्या

नितेश क्षीरसागर | कळंब तालुका प्रतिनिधी कळंब : येथील अंबिका नगर वॉर्ड क्रमांक १७ परिसरात भाड्याने राहणाऱ्या एका ग्रामसेवक युवकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शुक्रवार, दि. २४ जानेवारी २०२६ रोजी दुपारी १२ वाजताच्या सुमारास उघडकीस आली. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. आत्महत्या केलेल्या ग्रामसेवकाचे नाव प्रतीक संतोष इंगळे (वय २७, रा. चांदूरबाजार) … Read more

५० कि.मी. स्केटिंग अवघ्या ३ तासांत!

गिनीज विक्रमधारक कु. मनस्वी पिपरेचे मार्गभर अभूतपूर्व स्वागत सुरेश पाचभाई | मारेगाव मारेगाव : जिद्द, मेहनत आणि अपराजेय इच्छाशक्तीच्या जोरावर गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये आपले नाव कोरणाऱ्या कु. मनस्वी विशाल पिपरे हिने पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या क्रीडा इतिहासात सुवर्णाक्षरांनी नोंद केली. पांढरकवडा ते वणी असा तब्बल ५० किलोमीटरचा स्केटिंग प्रवास अवघ्या तीन तासांत पूर्ण करत … Read more

विद्यार्थ्यांनी ध्येयाचा सातत्याने पाठलाग करावा – आमदार संजय देरकर

वेगाव येथे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न सुरेश पाचभाई मारेगाव मारेगाव : ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी आपण शहरी विद्यार्थ्यांपेक्षा कमी आहोत, अशी कोणतीही हीन भावना न बाळगता आत्मविश्वासाने शिक्षण घ्यावे. ध्येयप्राप्तीसाठी सातत्य, मेहनत आणि सकारात्मक दृष्टिकोन आवश्यक असून, कोणत्याही अडचणींना न घाबरता आपल्या ध्येयाचा प्रामाणिकपणे पाठलाग करावा, असे प्रतिपादन वणी विधानसभा क्षेत्राचे आमदार संजय देरकर यांनी केले. … Read more

गरजूंना वेळेवर दिलासा; साई मित्र परिवारची रुग्णवाहिका दोन वर्षांपासून अविरत सेवेत

सुरेश पाचभाई | मारेगाव मारेगाव : दुर्गमतेशी झुंज देत, अडचणींवर मात करत आणि माणुसकीचा धागा घट्ट धरून सेवा हीच साधना या तत्त्वावर कार्यरत असलेल्या साई मित्र परिवारच्या रुग्णवाहिकेला दोन वर्षे पूर्ण झाली आहेत. आदिवासीबहुल मारेगाव तालुक्यात गेल्या दोन वर्षांपासून ही रुग्णवाहिका शेकडो गरजू, गोरगरीब व असहाय्य नागरिकांसाठी आशेचा आणि विश्वासाचा आधार ठरत आहे. डोंगरदऱ्या, जंगलपरिसर, … Read more

शिवशक्ती उच्च प्राथमिक शाळेत आनंदमेळावा उत्साहात संपन्न

तालुका प्रतिनिधी कळंब : रितेश क्षिरसागर स्थानिक कळंब येथील शिवशक्ती उच्च प्राथमिक शाळेत विद्यार्थ्यांच्या व्यवहारज्ञानाला चालना देण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेला भव्य आनंदमेळावा उत्साहात संपन्न झाला.शिवशक्ती शिक्षण संस्थेचे व्यवस्थापक प्रा. रविशंकर ऊर्फ बाळासाहेब धांदे यांच्या अध्यक्षतेखाली कळंब नगरपंचायतेचे बांधकाम सभापती चंद्रशेखर चांदोरे यांच्या हस्ते आनंदमेळाव्याचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी राळेगाव केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनचे तालुकाध्यक्ष … Read more

कळंब येथे खोदकामात पुरातन शिवपिंड व नंदी सापडले; नागरिकांची गर्दी

खोदकाम थांबले, श्रद्धा जागी; कळंबात शिवपिंड–नंदीचा शोध तालुका प्रतिनिधी कळंब :- रितेश क्षिरसागर कळंब शहरातील शिरभाते ले-आऊट येथील नगर पंचायतच्या ओपन स्पेसमध्ये सुरू असलेल्या खोदकामादरम्यान पुरातन काळातील शिवपिंड, नंदी व शिवलिंग आढळून आल्याने बुधवारी (दि. १५) परिसरात एकच खळबळ उडाली. घटनेची माहिती समजताच नागरिकांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली. नगर पंचायतच्या वतीने समाज भवनाच्या बांधकामासाठी पाण्याच्या … Read more

error: Content is protected !!