अडेगाव येथे शेतकऱ्यांचे रस्त्यासाठी आंदोलन

२८ जानेवारीपासून बेमुदत उपोषण ज्ञानेश्वर आवारी | झरी जामणी झरी जामणी तालुक्यातील मौजा अडेगाव (खंड क्रमांक १) येथील सर्व्हे क्रमांक ५१ मधील शेतकऱ्यांच्या शेतात जाणारा पारंपरिक वहिवाटीचा रस्ता कथितरीत्या बेकायदेशीररीत्या बंद करण्यात आल्याने परिसरात तीव्र असंतोषाचे वातावरण निर्माण झाले आहे. संबंधित रस्ता तात्काळ खुला करण्यात यावा, या मागणीसाठी आज दिनांक २८ जानेवारी २०२६ पासून अडेगाव … Read more

झरी जामणी येथील शेतकऱ्यांचे फार्म कप प्रशिक्षण उत्साहात संपन्न

ज्ञानेश्वर आवारी झरी जामणी झरी जामणी : पानी फाउंडेशन, कृषी विभाग व संपूर्ण महाराष्ट्र उमेद अभियान यांच्या संयुक्त विद्यमाने सुरु असलेल्या सत्यमेव जयते फार्मर कप स्पर्धेच्या अनुषंगाने झरी जामणी तालुक्यातील शेतकऱ्यांचे तीन दिवसीय निवासी प्रशिक्षण नुकतेच पार पडले. दिनांक 19 ते 21 जानेवारी 2026 दरम्यान महारोगी सेवा समिती, आनंदवन (वरोरा) येथे या प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात … Read more

भालेवाडी येथे लोकसहभागातून वनराई बंधारा

तालुका कृषी अधिकारी कार्यालयांचा पुढाकार सुरेश पाचभाई मारेगाव मारेगाव तालुक्यातील भालेवाडी येथे लोकसहभागातून वनराई बंधाऱ्याचे बांधकाम सुरू असून, या उपक्रमासाठी तालुका कृषी अधिकारी कार्यालयाने पुढाकार घेतला आहे. शेतकऱ्यांच्या शेतातील पाण्याची पातळी वाढवून शेती उत्पादनात वाढ व्हावी, या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात येत आहे. सहाय्यक कृषी अधिकारी प्रवीण कचाटे यांच्या मार्गदर्शनाखाली गावातील नागरिक व शेतकऱ्यांच्या सक्रिय … Read more

तालुक्यात नैसर्गिक शेतीचा जागर

शेतकऱ्यांचे प्रशिक्षणातून प्रबोधन सुरेश पाचभाई मारेगाव मारेगाव: राष्ट्रीय नैसर्गिक शेती अभियानांतर्गत मारेगाव तालुक्यातील सराटी येथे शेतकरी प्रशिक्षण कार्यक्रम उत्साहात पार पडला. तालुका कृषी अधिकारी कार्यालय, मारेगाव यांच्या वतीने आयोजित या प्रशिक्षणात सराटी व कान्हाळगाव येथील राष्ट्रीय नैसर्गिक शेती अभियान क्लस्टरमधील शेतकऱ्यांना नैसर्गिक शेतीबाबत सखोल मार्गदर्शन करण्यात आले. सराटी येथील नैसर्गिक शेती करणारे शेतकरी सुभाष ढेंगळे … Read more

रानडुकरांनी तीन एकरातील तूर पीक केले फस्त

शेतकऱ्याचे मोठे नुकसान; भरपाईची मागणी सुरेश पाचभाई । मारेगाव मारेगाव तालुक्यातील बुरांडा (ख) शिवारातील शेतकरी ज्ञानेश्वर आनंदराव सुरतेकर यांच्या शेतातील तुरीचे पीक रानडुकरांनी उद्ध्वस्त केल्याची घटना तीन दिवसांपूर्वी घडली. त्यांचे शेत गट क्रमांक १२८ मधील सुमारे तीन एकर क्षेत्रावरील तूर पीक रानडुकरांनी रात्रीच्या सुमारास अक्षरशः फस्त केल्याने शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. सुरतेकर यांची … Read more

जलसंवर्धनासाठी वनराई बंधारे मोहीम : कृषि विभागाचा पुढाकार

दुष्काळी भागात पाणी साठवण क्षमतेत वाढ; शेतकऱ्यांना शेतीसाठी दिलासा सुरेश पाचभाई मारेगाव, मारेगाव : तालुक्यात जलसंवर्धनाला चालना देण्यासाठी लोकसहभागातून विविध गावांमध्ये वनराई बंधारे उभारण्याची मोहीम तालुका कृषि अधिकारी कार्यालयाच्या वतीने राबविण्यात येत आहे. उपविभागीय कृषि अधिकारी चंदन निघोट यांच्या मार्गदर्शनाखाली तालुका कृषि अधिकारी दिपाली खवले यांच्या नेतृत्वाखाली ही मोहीम यशस्वीपणे सुरू असून अनेक गावांमध्ये वनराई … Read more

राष्ट्रीय नैसर्गिक शेती अभियान अंतर्गत दशपर्णी अर्क तयार : कृषि विभागाचा पुढाकार

सुरेश पाचभाई मारेगाव, मारेगाव : तालुक्यात राबविण्यात येत असलेल्या राष्ट्रीय नैसर्गिक शेती अभियान अंतर्गत एकूण ६ क्लस्टरमध्ये नैसर्गिक पद्धतीने अन्नधान्य उत्पादन घेतले जात आहे. या उपक्रमाचा भाग म्हणून हिवरा मजरा येथे दशपर्णी अर्क तयार करण्याचे प्रत्यक्ष प्रात्यक्षिक देत शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. कार्यक्रमात उपस्थित राहून तालुका कृषि अधिकारी कु.दिपाली खवले यांनी नैसर्गिक शेतीचे महत्त्व, तिचे … Read more

जागतिक मृदा दिन उत्साहात साजरा

जमिनीचे आरोग्य जपण्यासाठी कृषि विभागाचे आवाहन सुरेश पाचभाई मारेगाव मारेगाव:तालुका कृषि अधिकारी कार्यालय, मारेगाव यांच्या वतीने जागतिक मृदा दिनाचे औचित्य साधत वरुड गावात विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या निमित्ताने शेतकऱ्यांना जमिनीचे पोषण, मृदा संवर्धन व संतुलित खत व्यवस्थापनाबाबत मार्गदर्शन करण्यात आले. कार्यक्रमात तालुका कृषि अधिकारी कु.दिपाली खवले यांनी मृदा दिनाचा इतिहास, उद्देश आणि महत्व … Read more

गावोगावी सभा व चर्चासत्रे घेऊन गुलाबी बोंड अळी व रब्बीपूर्व मार्गदर्शन : कृषि विभागाचा उपक्रम

सुरेश पाचभाई मारेगाव मारेगाव : तालुक्यातील विविध गावांमध्ये शेतकरी सभा व चर्चासत्रांच्या माध्यमातून गुलाबी बोंड अळी नियंत्रण तसेच हरभरा, तुर व रब्बी पिकांच्या एकात्मिक व्यवस्थापनाबाबत मार्गदर्शन करण्यासाठी तालुका कृषि अधिकारी कार्यालय, मारेगाव यांच्यावतीने विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. तालुका कृषि अधिकारी कु. दिपाली खवले यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व सहाय्यक कृषि अधिकारी, उपकृषि अधिकारी व मंडळ कृषि … Read more

कृषि विभागाच्या पुढाकाराने ‘सत्यमेव जयते फार्मर कप’चे शेतकरी प्रशिक्षण यशस्वी

सुरेश पाचभाई मारेगाव मारेगाव : तालुक्यात गटशेतीची संकल्पना रूजवून कृषि क्षेत्रात शाश्वत समृद्धी आणण्याच्या उद्देशाने कृषि विभाग आणि पानी फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने ‘सत्यमेव जयते फार्मर कप’ करिता शेतकरी प्रशिक्षण कार्यक्रम उत्साहात पार पडला. पानी फाउंडेशनच्या तज्ज्ञ मार्गदर्शकांनी शेतकऱ्यांना गटशेतीचे महत्त्व, गटबांधणीची आवश्यक प्रक्रिया आणि त्यातून साध्य होणारे सामूहिक फायदे याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. कार्यक्रमास … Read more

error: Content is protected !!