शेवटी ईच्छा झाली पुरी !! घरकुल आले रे दारी !!

मारेगाव तालुक्यातील  प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण अंतर्गत घरकुलच्या काही कामाला झाली आहे सुरवात. पंचायत समिती अधिकारी समोरिल पाणी टंचाई समस्या लक्षात घेऊन  घरकूलाच्या फाईली जमा करण्याकरिता लाभार्थ्यांना वारंवार देत आहेत सूचना. मारेगांव तालुका प्रतिनिधी:- सुरेश पाचभाई[9922862184] सविस्तर वृत्त असे की.मारेगाव तालुक्यातील पंचायत समिती अंतर्गत एकूण   56 ग्रामपंचायती मधील नवीन निवड पात्र लभार्थि 569 पैकी 411 … Read more

अल्प वयीन बालिकेवर अत्याचार करुण नराधम पसार.

काही वेळातच मारेगाव पोलिसांनी आवरल्या मुसक्या. मारेगांव तालुका प्रतिनिधी:- सुरेश पाचभाई[9922862184] सविस्तर वृत्त असे की…कुंभ्या जवडील शेत शिवारात शौचास जात असलेल्या एका 17 वर्षीय बालिकेवर 2 अज्ञात तरुणांनी बडजब्रीने ओडत नेले व तिच्यावर अत्याचार केल्याची खडबड जनक घटना. आज दिनाक 21 मार्च रोज सोमवारला दुपारच्या सुमारास घडली आहे. तालुक्यातील कुंभ्या जवळील एका शेतशिवारात दुपारच्या सुमारास  … Read more

बुरांडा (खडकी) येथील विष प्राशन केलेल्या एका 48 वर्षीय विवाहीताचा उपचारा दरम्यान मृत्यू.

मारेगाव तालुक्यात आत्महत्येची सत्र सूरूच असताना काल सायंकाळच्या 6 वाजताच्या सुमारास बुरांडा (ख) येथील गजानन नागो वासेकर वय सुमारे (48) असे मृताचे नाव असून त्यांनी काल शनिवारला स्वतच्या शेतात विष प्राशन केले होते व त्यांना वणी येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले होते.पण शनिवारी रात्रीच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मावली . मारेगांव तालुका प्रतिनिधी:- सुरेश पाचभाई[9922862184] सविस्तर … Read more

नाटक हे साहित्याचा अविभाज्य घटक आहेत.

प्रतिनिधी:- वणी सविस्तर वृत्त असे की.नाटक हे साहित्याचा अविभाज्य घटक आहेत.तसेच ते समाजातील वास्तव चित्रण करणारे प्रभावी माध्यम आहे.असे प्रतिपादन काल शेतकरी मंदिर वणी येथे अंजना उत्तम बहूउद्देशिय संस्थने आयोजित केलेल्या क्षण एक पुरे या राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त नाटकातील कलावंतांच्या सत्काराप्रसंगी मा.प्रा.टिकाराम कोंगरे अध्यक्ष यवतमाळ मध्यवर्ती जिल्हा सहकारी बँक यवतमाळ हे सत्कारा प्रसंगी बोलत होते. … Read more

अखेर हटवांजरी पोडाच्या रस्त्याच्या कामाला सुरुवात.

प्रशासनाच्या वतीने चक्का जामच्या एक दिवसा आधी करण्यात आली कामाला सुरूवात. मारेगांव तालुका प्रतिनिधी:- सुरेश पाचभाई[9922862184] सविस्तर वृत्त असे की..मारेगाव तालुक्यातील हटवांजरी (पोड) येथे जाणाऱ्या शासकीय रस्त्यावर  एका शेतकऱ्यांनी रब्बी पिकाची पेरणी करून जाणुन- बुजुन गेल्या अनेक वर्षापासून रस्ताच्या कामात अळथळा निर्माण केला होता.आदिवासी पोडाचा विकास होऊ नये या दृष्ट हेतुने अळथळा निर्माण केला .असे … Read more

धुलीवंदनच्या मुहूर्तावर उद्या ला बोरी(गदाजी) येथील भव्य गोटमार यात्रा उत्सव.

मारेगांव तालुका प्रतिनिधी:- सुरेश पाचभाई[9922862184] सविस्तर वृत्त असे की..मारेगाव तालुक्यातील शेवटच्या टोकाला असलेल्या बोरी(गदाजी) येथे होलिका पर्वावर 2 दिवसीय यात्रा महोत्सव उद्याला शुक्रवार  दिनांक 18 मार्चला सुरु होत असुन ही गेल्या अनेक वर्षांपूर्वी पासुन परंपरा आहे. बोरी (गदाजी) येथील गोटमार यात्रेला अनेक वर्षापुर्वीपासुन परंपरा असुन राज्यासह लगतच्या राज्यात ही यात्रा प्रसिद्ध आहे. गावाच्या बाजूला लागूनच … Read more

गाव आहे चांगला !! पण रस्ता वेशीला टांगला !!!

* नवरगाव ते सगनापुर परिसरातील जनता म्हणते रस्त्यात खड्डे की खड्यात रस्ता ??? मारेगांव तालुका प्रतिनिधी:- सुरेश पाचभाई[9922862184] सविस्तर वृत्त असे की.मारेगाव  तालुक्यातील मौजा नवरगाव ते सगणापुर ह्या रस्त्याचे काम सुमारे 17 वर्षाचा आधी करण्यात आले होते.त्या नंतर या मार्गावर 2 वेळा तात्पुरती थातुर माथूर डागडुगी सार्वजनिक बांधकाम विभागा कडून करण्यात आली होती.पण अवघ्या काही … Read more

बस अभावी जनतेची फरपट.

# परिक्षा काळात विद्यार्थ्यांचे हाल तालुका प्रतिनीधी :-झरी (जामणी) ज्ञानेश्वर आवारी ( 88059 79173) सविस्तर वृत्त असे की..झरी जामणी :- गेल्या दोन वर्षांपासून  लालपरी चे दर्शन झरी तालुका वासियांसाठी दुर्लभ झाले आहे . 2020 च्या पहिल्या  टप्प्यात  लॉक डाऊन मध्ये  राज्यात बससेवा बंद करण्यात आली . त्यानंतर  मध्यंतरी काही  थोडा काळ लाक डाऊन शिथिल करण्यात … Read more

वेगाव येथे आज कृषी विज ग्राहक तक्रार निवारण मेळाव्याचे आयोजन करण्यात आले.

मारेगाव उपविभागा मधील सर्व कृषीपंप वीजग्राहकांनच्या वीजबिल विषयी व इतर तक्रारींचे निवारण कारण्यात आले. मारेगांव तालुका प्रतिनिधी:- सुरेश पाचभाई[9922862184] सविस्तर वृत्त असे की. मारेगांव तालुक्यातील वेगांव येथे आज मंगळवार दिनांक 15 मार्च 2022 रोजी मारेगाव उपविभागा मधील सर्व कृषीपंप वीजग्राहकांनच्या वीजबिल विषयी व इतर तक्रारींचे निवारण करण्याच्या अनुषंगाने वेगाव ग्रामपंचायतीच्या आवारा मध्ये सकाळी 9:00 वाजता … Read more

मारेगाव शहरात वीज बिल भरणा केंद्र सूरू करा अशी मनसेची मागणी…

मारेगांव तालुका प्रतिनिधी:- सुरेश पाचभाई[9922862184] सविस्तर वृत्त असे की..मारेगाव तालुका हा आदिवासी बहुल तालुका असून येथील विज देयक भरणा केंद्र मारेगाव शहरा पासून सुमारे 2 की. मी अंतरावर आहे.ग्रामीण भागातील लोकांना विज बिल भरणा करण्यासाठी त्या मार्गाने पुरेसे वाहणे जात नसल्याने लोकांना पायदळ ये-जा करावे लागते. व लोकांचा वेळ वाया तर जातोच पण नाहक त्रास … Read more

error: Content is protected !!