बुरांडा–हटवांजरी रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य

वाहनचालकांचा जीव धोक्यात; संबंधित विभाग मात्र ‘झोपेत’! सुरेश पाचभाई | मारेगाव मारेगाव तालुक्यातील बुरांडा (ख) ते हटवांजरी हा मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत सन २०१७-१८ मध्ये तयार करण्यात आलेला रस्ता आज अक्षरशः मृत्यूचा सापळा बनला असून रस्त्यावर पडलेल्या मोठमोठ्या खड्ड्यांमुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. लाखो रुपये खर्च करून तयार करण्यात आलेल्या या रस्त्याची … Read more

मां वैष्णोदेवी देवदर्शन यात्रेसाठी भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

सुरेश पाचभाई | मारेगाव मारेगाव : धार्मिक श्रद्धा, पर्यटन आणि सामाजिक एकोप्याचा सुंदर संगम ठरलेली “मां वैष्णोदेवी देवदर्शन यात्रा” यंदा मोठ्या उत्साहात संपन्न झाली. या यात्रेला भाविकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्याने संपूर्ण परिसर भक्तीमय वातावरणाने भारावून गेला होता. उत्तर भारतातील विविध धार्मिक व पर्यटन स्थळांचा समावेश असलेल्या या यात्रेमुळे भाविकांना अध्यात्मिक समाधानासह निसर्गरम्य स्थळांचा अविस्मरणीय अनुभव … Read more

मारेगाव तालुक्याचा दहावी निकालात झेंडा

विद्या निकेतनचा १०० टक्के जलवा! सुरेश पाचभाई | मारेगाव मारेगाव : माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या इयत्ता दहावीच्या परीक्षेचा निकाल काल दिनांक ८ मे २०२६ रोज शुक्रवारी सकाळी ११:३० वाजता ऑनलाइन जाहीर करण्यात आला. यावर्षी मारेगाव तालुक्याचा एकूण निकाल ८५ टक्के लागला असून विद्यार्थ्यांनी समाधानकारक यश संपादन केले आहे. तालुक्यातील मुलींनी पुन्हा … Read more

जुन्या काळातील ‘आटाचक्की’ ठरली गावाच्या संस्कृतीची साक्षीदार

आधुनिक युगात हरवत चाललेली परंपरा सुरेश पाचभाई, मारेगाव मारेगाव : एकेकाळी गावागावांत घराघरात धान्य दळण्याचा आवाज घुमायचा… सकाळच्या शांत वातावरणात फिरणाऱ्या दगडी जात्याचा आवाज म्हणजे ग्रामीण जीवनाचा अविभाज्य भाग होता. आज आधुनिक इलेक्ट्रिक गिरण्या आणि मशीनच्या युगात ही पारंपरिक आटाचक्की इतिहासाच्या पानांमध्ये हरवत चालली आहे. मात्र अजूनही काही ठिकाणी जुन्या काळाची साक्ष देणारी ही दगडी … Read more

मारेगावात मेच्या तडाख्यानंतर पावसाची दमदार एन्ट्री; नागरिकांना मोठा दिलासा

सुरेश पाचभाई | मारेगाव मारेगाव मे महिन्याच्या सुरुवातीलाच मारेगाव तालुक्यात उन्हाने अक्षरशः आग ओकली होती. गेल्या काही दिवसांपासून तापमानाचा पारा तब्बल ४३ ते ४४ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचल्याने नागरिक त्रस्त झाले होते. दुपारच्या वेळेत घराबाहेर पडणेही कठीण झाले होते. रस्त्यांवर शुकशुकाट दिसत होता, तर उष्णतेच्या तीव्र लाटेमुळे जनजीवन विस्कळीत झाले होते. अशा असह्य उकाड्यानंतर गुरुवार, दिनांक … Read more

ग्रामजागृतीचा धडाका! कानडा (पार्डी)त ग्राम जयंती सप्ताहात विकासाची नवी पहाट; वाचनालयाचे दिमाखात उद्घाटन

सुरेश पाचभाई, मारेगाव मारेगाव : तालुक्यातील पंचायत समिती मारेगाव अंतर्गत येणाऱ्या कानडा (पार्डी) गावाने ग्रामजागृतीचा आदर्श घालून देत ग्राम जयंती सप्ताह उत्साहात व शिस्तबद्ध पद्धतीने साजरा केला. विविध लोकोपयोगी उपक्रमांच्या मालिकेतून ग्रामविकासाचा ठोस संदेश देण्यात आला. या सप्ताहाचा समारोप दि. ३० एप्रिल २०२६ रोजी नूतन वाचनालयाच्या दिमाखदार उद्घाटनाने झाला. सरपंच सौ. सुषमा रूपेश ढोके यांच्या … Read more

मारेगाव तालुका हादरला! आणखी एका शेतकऱ्याची आत्महत्या; विषारी औषध प्राशनाचा संशय

सुरेश पाचभाई मारेगाव मारेगाव आधीच संकटांच्या विळख्यात सापडलेल्या मारेगाव तालुक्यात पुन्हा एकदा शेतकरी आत्महत्येची धक्कादायक घटना समोर आली असून, या घटनेने संपूर्ण तालुका हादरून गेला आहे. गोरज येथील 42 वर्षीय शेतकरी अविनाश लटारी पानघाटे यांनी विषारी औषध प्राशन करून जीवन संपवल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. 23 एप्रिल रोजी सायंकाळी सुमारे 7 वाजण्याच्या सुमारास ही … Read more

माजी पोलीस पाटील रामचंद्र मत्ते यांचे निधन

सुरेश पाचभाई मारेगाव मारेगाव तालुक्यातील सगनापूर येथील ज्येष्ठ व प्रतिष्ठित नागरिक तसेच माजी पोलीस पाटील रामचंद्र बापूराव मत्ते (वय ८६) यांचे दीर्घ आजाराने मंगळवार, दिनांक २२ एप्रिल २०२६ रोजी दुपारी २.३० वाजता दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनाने संपूर्ण सगनापूर परिसरावर शोककळा पसरली आहे.रामचंद्र मत्ते यांनी आपल्या कार्यकाळात पोलीस पाटील म्हणून गावाच्या सामाजिक व प्रशासकीय कामकाजात … Read more

शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या

सुरेश पाचभाई, मारेगाव मारेगाव पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या सुर्ला येथे एका शेतकऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना आज बुधवार (दि. २२ एप्रिल २०२६) सकाळी उघडकीस आली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून शेतकरी वर्गात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. मृत शेतकऱ्याचे नाव विलास हरिचंद्र मेश्राम (वय ५१, रा. सुर्ला, ता. झरी जामणी, जि. … Read more

पार्डीत शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या; परिसरात खळबळ

सुरेश पाचभाई मारेगाव मारेगाव : तालुक्यातील पार्डी येथे एका शेतकऱ्याने स्वतःच्या शेतात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना मंगळवार (दि. 21 एप्रिल 2026) रोजी सकाळी साडेदहा वाजताच्या सुमारास उघडकीस आली. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून ग्रामस्थांतून हळहळ व्यक्त होत आहे. मृत शेतकऱ्याचे नाव कैलाश चंद्रभान गाडगे (वय 55, रा. पार्डी, ता. मारेगाव, जि. … Read more

error: Content is protected !!