बोटोनी येथे ‘महाराजस्व समाधान शिबिरा’चा आज शुभारंभ

नागरिकांच्या प्रश्नांना जागेवरच न्याय; प्रशासनाचा लोकाभिमुख उपक्रम सुरेश पाचभाई, मारेगाव मारेगाव : नागरिकांच्या विविध महसुली अडचणींना तात्काळ दिलासा देण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या ‘महाराजस्व समाधान शिबिरा’चा आज, शुक्रवार दि. १० एप्रिल रोजी बोटोनी येथे उत्साहात शुभारंभ होत आहे. तहसील कार्यालय मारेगाव, महसूल मंडळ जळका (बोटोनी) यांच्या पुढाकाराने तसेच महावितरण, आरोग्य, वन, कृषी, पोलीस आणि एसटी महामंडळ … Read more

सराटीत महिलांचा एल्गार

अवैध दारूविक्रीविरोधात थेट कारवाई प्रशासनाला ५ दिवसांचा अल्टिमेटम सुरेश पाचभाई, मारेगाव मारेगाव तालुक्यातील सराटी गावात अवैध दारूविक्रीविरोधात महिलांनी आज जोरदार एल्गार पुकारत थेट कारवाईचा मार्ग अवलंबला. बुधवारी (दि. ९ एप्रिल) सकाळी साडेनऊच्या सुमारास महिलांनी एकत्र येत गावातील संशयित अवैध दारू विक्रेत्याच्या घरावर धाड टाकून मोठ्या प्रमाणात ‘पोवे’ जप्त केल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेमुळे … Read more

मार्डी–बामर्डा जंगलात फिल्मी स्टाईल दरोड्याचा प्रयत्न फसला; ३ लाखांची रक्कम सुखरूप

सुरेश पाचभाई, मारेगाव मारेगाव : मार्डी–बामर्डा जंगल परिसरात धावत्या दुचाकीस्वाराला लाथ मारून खाली पाडत लूटमार करण्याचा थरारक प्रयत्न सोमवारी रात्री घडला. मात्र नशिबाच्या जोरावर हा मोठा अनर्थ टळला असून, तब्बल ३ लाख रुपयांची रोकड असलेली बॅग दरोडेखोरांच्या हाती न लागता सुरक्षित सापडल्याने सर्वांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. चोपण येथील रहिवासी चेतन विजय चिंचोळकर (वय २५) हे … Read more

फिस्की जंगलात थरारक दरोडा!

दुचाकीस्वाराला लक्ष्य करत ३ लाखांवर डल्ला; मारेगाव तालुक्यात खळबळ सुरेश पाचभाई मारेगाव मारेगाव तालुक्यातील ग्राम मछिंद्रा ते बांबर्डा दरम्यान असलेल्या फिस्की जंगल परिसरात सोमवारी (दि. ६ एप्रिल) रात्री सुमारे ८.५० वाजताच्या सुमारास तीन अज्ञात इसमांनी दुचाकीस्वाराला अडवून त्याच्याकडील ३ लाख रुपये व कागदपत्रे हिसकावून नेल्याची घटना घडली आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी चेतन विजय चिंचोलकर … Read more

वेगांव येथे अव्यान गौरकारचा दुसरा वाढदिवस उत्साहात

सुरेश पाचभाई मारेगाव मारेगाव तालुक्यातील वेगांव येथील गौरकार कुटुंबातील चिमुकला कुमार अव्यान रोहित गौरकार याचा दुसरा वाढदिवस मंगळवार, दि. ७ एप्रिल २०२६ रोजी आनंदात साजरा करण्यात येत आहे.या निमित्ताने गौरकार कुटुंबात उत्साहाचे वातावरण असून वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. अव्यानच्या वाढदिवसानिमित्त त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.या शुभदिनी अव्यानला आई अनुजा रोहित गौरकार, वडील … Read more

वेगांवमध्ये ‘महाकाला’चा अभूतपूर्व जल्लोष

ज्ञानगिरी बाबा मठ वास्तुशांतीनिमित्त भक्तांचा महासागर उसळणार! सुरेश पाचभाई, मारेगाव मारेगाव तालुक्यातील निर्गुणा नदीच्या पवित्र तीरावर वसलेले वेगांव येथे दिनांक ५ व ६ एप्रिल रोजी भक्ती, श्रद्धा आणि परंपरेच्या महासागरात अक्षरशः बुडून जाणार आहे. संत परंपरेचा दिव्य वारसा लाभलेल्या या भूमीत प्रथमच इतक्या भव्य स्वरूपात ‘महाकाला’ सोहळा रंगणार असून, संपूर्ण परिसरात सध्या उत्साहाची लाट उसळली … Read more

हिवरीच्या लेकीची कर्तृत्वगाथा!

सलून चालकाच्या मुलीची यवतमाळ पोलीस दल मध्ये दमदार एन्ट्री सुरेश पाचभाई, मारेगाव मारेगाव तालुक्यातील हिवरी या छोट्याशा गावातून एक प्रेरणादायी यशोगाथा समोर आली असून, अत्यंत साध्या व गरीब कुटुंबातील कु. समीक्षा विलास हनुमंते हिने जिद्द, चिकाटी आणि कठोर परिश्रमाच्या जोरावर यवतमाळ येथील पोलीस दलात ‘ओपन’ प्रवर्गातून स्थान मिळवत गावासह तालुक्याचे नाव उज्ज्वल केले आहे. काल … Read more

जालियनवाला बाग ते वाघा बॉर्डर… विद्यार्थ्यांची इतिहास, संस्कृती आणि देशभक्तीची अविस्मरणीय सफर!

सुरेश पाचभाई मारेगाव मारेगाव – कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, मारेगाव येथील विद्यार्थ्यांनी नुकत्याच पार पडलेल्या शैक्षणिक सहलीत इतिहास, संस्कृती आणि निसर्गाचा अनोखा संगम अनुभवत देशभक्तीची प्रेरणा घेतली. दि. २२ मार्च २०२६ ते ३० मार्च २०२६ दरम्यान आयोजित या सहलीत ५२ विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग होता. या सहलीचे प्रमुख आकर्षण ठरले अमृतसर येथील जालियनवाला बाग राष्ट्रीय … Read more

टिप्परच्या जीवघेण्या ओव्हरटेकमुळे पत्रकार गंभीर जखमी

निंबाळा फाट्याजवळ भीषण अपघात; हेल्मेटमुळे बचाव सुरेश पाचभाई मारेगाव मारेगाव – वणी मार्गावर बेदरकार टिप्परचालकांच्या वाढत्या दहशतीचे आणखी एक धक्कादायक उदाहरण शनिवारी (दि. २६ मार्च) दुपारी समोर आले. मारेगाव येथील पत्रकार ज्योतिबा पोटे हे दुचाकीने प्रवास करत असताना, निंबाळा फाट्याजवळील टाटा मोटर्स शोरूमसमोर एका भरधाव टिप्परने धोकादायक पद्धतीने ओव्हरटेक केल्याने भीषण अपघात घडला. या अपघातात … Read more

मारेगावात रामनवमीची भव्य शोभायात्रा

सामाजिक एकतेचा ‘धडाकेबाज’ संदेश! सुरेश पाभाई | मारेगाव मारेगाव नगरीत रामनवमी निमित्त काढण्यात आलेल्या भव्य शोभायात्रेने यंदा अक्षरशः इतिहास रचला. श्रीराम नवमी उत्सव समिती आणि बजरंग दल, मारेगाव यांच्या संयुक्त विद्यमाने पार पडलेल्या या मिरवणुकीत हजारोंच्या जनसागराने उसळ घेत शहरात सामाजिक एकतेचे अद्वितीय दर्शन घडवले. २६ मार्च रोजी सायंकाळी शहराच्या मुख्य मार्गावरून निघालेल्या या शोभायात्रेची … Read more

error: Content is protected !!