केगावचा अभिमान! दुर्गे भावंडांचा ‘धडाकेबाज’ सत्कार

जिद्द आणि कष्टांची प्रेरणादायी गाथा प्रमोद रा.मेश्राम तालुका प्रतिनिधी मारेगाव मारेगाव: छोटंसं गाव, मोठी स्वप्नं… आणि त्याहून मोठी जिद्द! मारेगाव तालुक्यातील केगाव येथील दुर्गे भावंडांनी आपल्या कर्तृत्वाने केवळ कुटुंबाचंच नव्हे, तर संपूर्ण गावाचं नाव उज्वल केलं आहे. शेतकरी कुटुंबातील अमित राजेश दुर्गे आणि आचल राजेश दुर्गे या भाऊ-बहिणींनी नुकत्याच पार पडलेल्या पोलीस भरती प्रक्रियेत दणदणीत … Read more

यवतमाळमध्ये पेट्रोल-डिझेल तुटवड्याच्या अफवा; जिल्हाधिकाऱ्यांचा कडक आदेश

नियमभंग करणाऱ्यावर फौजदारी कारवाईचा इशारा सुरेश पाचभाई | मारेगाव मारेगाव: यवतमाळ जिल्ह्यात पेट्रोल-डिझेल तुटवड्याच्या अफवांनी अचानक जोर धरल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून अनेक ठिकाणी पेट्रोल पंपांवर अनावश्यक गर्दी उसळल्याचे दिसून येत आहे. परिस्थिती हाताबाहेर जाण्याची चिन्हे दिसताच जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी विकास मीना यांनी तातडीने हस्तक्षेप करत कडक आदेश दि. २७ मार्च रोजी … Read more

केगावच्या मातीतील जिद्दीचा विजय!

एकाच घरातील भाऊ-बहिण पोलीस भरतीत झळकले सुरेश पाचभाई, मारेगाव मारेगाव तालुक्यातील केगाव या छोट्याशा गावाने जिद्द, मेहनत आणि स्वप्नांची एक प्रेरणादायी कहाणी घडवली आहे. शेतकरी कुटुंबातील दुर्गे परिवारातील भाऊ-बहिण—अमित राजेश दुर्गे आणि आचल राजेश दुर्गे—यांनी नुकत्याच पार पडलेल्या पोलीस भरती प्रक्रियेत दणदणीत यश मिळवत थेट पोलीस खात्यात स्थान पटकावले आहे. एका सामान्य शेतकरी कुटुंबातील ही … Read more

मारेगावात समाजोपयोगी पाणपोईचे थाटात उद्घाटन

उन्हाळ्यात नागरिकांना दिलासा; “जल ही जीवन आहे”चा संदेश सुरेश पाचभाई मारेगाव मारेगाव, दि. 28 मार्च — वाढत्या उन्हाच्या पार्श्वभूमीवर मारेगावात नागरिकांच्या सेवेसाठी उभारण्यात आलेल्या पाणपोईचे आज उत्साहात उद्घाटन करण्यात आले. स्वर्गीय मारोती पाटील रोगे व स्वर्गीय सुंदराबाई रोगे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ दयालभाऊ रोगे यांच्या पुढाकारातून हा स्तुत्य उपक्रम राबविण्यात आला. मारेगाव येथील पोलीस वेल्फेअर पेट्रोल पंप … Read more

मारेगावात रामनामाचा जयघोष; आज भव्य शोभायात्रेने दुमदुमणार शहर!

सुरेश पाचभाई, मारेगाव मारेगाव नगरी आज अक्षरशः राममय झाली असून प्रभू श्रीरामचंद्रांच्या जन्मोत्सवानिमित्त आयोजित भव्य शोभायात्रेची जय्यत तयारी पूर्ण झाली आहे. रामनवमीच्या पावन पर्वावर शहरात भक्ती, उत्साह आणि एकतेचा अद्भुत संगम पाहायला मिळत आहे. श्रीराम नवमी उत्सव समिती व बजरंग दल मारेगाव यांच्या संयुक्त विद्यमाने आज, दि. २६ मार्च रोजी सायंकाळी ४:३० वाजता नगर पंचायतजवळील … Read more

खापरी मार्ग ‘डेथ ट्रॅप’ प्रकरणी प्रशासनाची धावपळ

विदर्भ एस.पी. न्यूजच्या बातमीचा जबरदस्त इम्पॅक्ट सुरेश पाचभाई मारेगाव मारेगाव, “अपघात झाल्यास जबाबदार कोण?” असा थेट आणि धारदार सवाल उपस्थित करणाऱ्या विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्कच्या वृत्ताचा अखेर जबरदस्त परिणाम दिसून आला असून, खापरी मार्गावरील जीवघेण्या रस्त्याच्या दुरुस्तीला प्रशासनाने उशिरा का होईना, पण सुरुवात केली आहे. मात्र, नागरिकांच्या संतापाचा उद्रेक आणि माध्यमांच्या धडाकेबाज पाठपुराव्यानंतरच यंत्रणा जागी … Read more

लाडक्या ओवीचा दुसरा वाढदिवस उत्साहात साजरा

माडेकर कुटुंबात आनंदाची उधळण सुरेश पाचभाई, मारेगाव मारेगाव तालुक्यातील कुंभा येथील माडेकर कुटुंबात आज आनंदाचा आणि उत्साहाचा जल्लोष पाहायला मिळत आहे. कु. श्रीजा उर्फ ओवी जगदीश माडेकर हिचा दुसरा वाढदिवस आज मोठ्या थाटामाटात साजरा करण्यात येत आहे. अवघ्या दोन वर्षांच्या या चिमुकलीने आपल्या निरागस हास्याने आणि गोंडस खोडकर लीलांनी संपूर्ण कुटुंबाचे मन जिंकले आहे. तिच्या … Read more

यवतमाळ येथे युवा कवयित्री प्रांजली तुराणकर इला समाज गौरव पुरस्कार’

सुरेश पाचभाई मारेगाव मारेगाव यवतमाळ, दि. २२ मार्च २०२६ : येथील आयोजित परिचय मेळावा व विचारवंतांची परिषद २०२६ या कार्यक्रमात युवा कवयित्री कु. प्रांजली रामदास तुराणकर यांना ‘इला समाज गौरव पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार त्यांच्या सामाजिक तसेच साहित्यिक कार्याची दखल घेऊन देण्यात आला. कार्यक्रमाच्या उद्घाटिका श्रीमती आशाताई काळे (संचालिका, ग्राम स्वराज्य महामंच) यांच्या … Read more

गौराळा खदानजवळ भीषण अपघात; दुचाकीस्वार ठार

सुरेश पाचभाई मारेगाव मारेगाव: वणी–यवतमाळ मार्गावरील गौराळा खदानजवळ 23 मार्च रोजी सायंकाळी सुमारे 7 वाजताच्या सुमारास भीषण अपघात घडून एका तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.मुक्टा (ता. मारेगाव) येथील नारायण पंढरी पोईनकर (वय 35) हे आपल्या स्प्लेंडर दुचाकीने मारेगावहून वणीच्या दिशेने जात असताना रस्त्यावर उभ्या असलेल्या टिप्परला जोरदार धडक दिली. … Read more

फिसकी जंगलातील मृत्यूचा सापळा ठरलेला रस्ता अखेर दुरुस्तीच्या मार्गावर!

शिवसेनेच्या चक्काजामने प्रशासनाला ‘खडबडून’ जाग – दुसऱ्याच दिवशी कामाला सुरुवात सुरेश पाचभाई | मारेगाव मारेगाव तालुक्यातील मार्डी–वणी मार्गावरील मच्छिंद्रा परिसरातील फिसकी जंगलातील रस्ता अक्षरशः मृत्यूचा सापळा बनला होता. खोल खड्डे, खचलेले कडे आणि धोकादायक साईड पट्ट्यांमुळे दररोज प्रवास करणाऱ्या नागरिकांचा जीव टांगणीला लागला होता. वारंवार अपघात घडत असल्याने परिसरात भीतीचे सावट होते. मात्र प्रशासनाच्या निष्क्रियतेमुळे … Read more

error: Content is protected !!